महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदारांना बल्क एसएमएस पाठवून प्रचार; निवडणूक आयोगाची काँग्रेस उमेदवाराला नोटीस - परभणी न्युज

परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रविराज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर पाठविण्यात येणाऱ्या बल्क 'एसएमएस'च्या माध्यमातून प्रचाराची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस उमेदवार

By

Published : Oct 11, 2019, 9:31 PM IST

Updated : Oct 11, 2019, 11:08 PM IST

परभणी -मतदारांना बल्क एसएमएस पाठवून प्रचार करणाऱ्या परभणीच्या काँग्रेस उमेदवाराला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी नोटीस पाठवली आहे. कुठलीही परवानगी न घेता एसएमएसच्या माध्यमातून हा प्रचार होत असल्याचे निवडणूक प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठवून त्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा करणार असल्याचा इशाराही संबंधित उमेदवाराला देण्यात आला आहे.

मतदारांना बल्क एसएमएस पाठवून प्रचार

परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रविराज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर पाठविण्यात येणाऱ्या बल्क 'एसएमएस'च्या माध्यमातून प्रचाराची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे. शिवाय समाज माध्यमातून प्रचार करू नये, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. शिवाय या प्रकाराबद्दल आपल्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येईल, असेही ठणकावले आहे.

हे वाचलं का? - करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था

समाजमाध्यमाद्वारे प्रचार करू नका - जिल्हाधिकारी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वसामान्य नागरीक आपल्या समाजमाध्यमाचा (सोशल मीडिया) वापर करीत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. असा वापर करणे म्हणजे आदर्श आचारसाहिंतेचा भंग आहे. अशा पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीने कोणत्याही उमेदवाराची पोस्ट प्रसिद्ध करू नये. तसेच शेअर करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

हे वाचलं का? -'होय...माझ्याकडेही काळा पैसा आहे'

दरम्यान, फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब इत्यादी समाजमाध्यमावरून विधानसभा निवडणुकीस उभ्या असलेल्या विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे चिन्ह, झेंडा, नाव, मतदान करण्याचे आवाहन आणि निवडणुकीविषयी छायाचित्र व उमेदवाराच्या समर्थनार्थ इत्यादी स्वरुपाचा मजकूर प्रसिद्ध व प्रसारित करण्यात येत आहे, असे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. आदर्श निवडणूक आचारसाहिंतेनुसार उमेदवाराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या पोस्ट करण्याविषयी अधिकृत समाजमाध्यमातील खात्यांनाच प्रसिद्ध करण्याविषयी अधिकृतता आहे. जी माहिती प्रसिद्ध करावयाची आहे, ती माहिती एम.सी.एम.सी. कडून प्रमाणित करून परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी सांगितले आहे.

Last Updated : Oct 11, 2019, 11:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details