परभणी- शहरातील विविध गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदावर विसर्जनासाठी गर्दी केली आहे. वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर हे हौद तयार करण्यात आले होते. याठिकाणी श्रींच्या मूर्तींचे संकलन करून त्याचे हौदात विसर्जन केले जात आहे.
परभणीत महापालिकेच्या कृत्रिम हौदावर 'श्रीं'च्या विसर्जनासाठी गर्दी - गणेश मिरवणूक
अनंत चतुर्दशी निमित्त दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेने मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहण्यात येत आहे.
रात्री उशिरा पर्यंत चालणार श्रींची मिरवणूक आणि देखावे -
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे परभणी शहरातील विविध गणेश मंडळांच्या श्रींची मिरवणूक आणि देखाव्यांचे सादरीकरण रात्री उशिरा पर्यंत चालणार आहे. यावेळी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीसाठी वेळ देण्यात आला असून यामुळे संध्याकाळी आठच्या सुमारास नारायण चाळीतून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि पुढे शिवाजी चौकातपर्यंत या मिरवणुका चालतील. सर्वात प्रथम मोठा मारुती परिसरातील मानाच्या गणपतीची पालखी जाते. यानंतर विविध गणेश मंडळ देखाव्यांसह मिरवणुकित सहभागी होतात. देखावे पाहण्यासाठी परभणीकर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात.
हेही वाचा - हिंगोलीत भाविकांची चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीचा दर्शनासाठी अलोट गर्दी