परभणी- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जल्लोषात असलेल्या तरुणांना दारू पिऊन वाहने चालवण्याचा चांगलाच दणका बसला आहे. परभणी शहरातील वाहतूक शाखेने 24 तरुणांवर दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर भागांमध्ये 9 गुन्हे दाखल झाले असून एकूण 33 गुन्हे दाखल झाले आहेत.
'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह' प्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल हेही वाचा -३ जानेवारीला परभणीतील कृषी महाविद्यालयात महिला शेतकरी मेळावा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या पार्ट्या, आतषबाजी करण्यात येते. त्यानुसार परभणी शहरात देखील अनेक तरुण मंडळी हा जल्लोष साजरा करण्यासाठी मंगळवारी रात्री घराबाहेर पडली होती. परंतु, दारू प्यायल्यानंतर वाहन चालवू नये, असे आवाहन यापूर्वीच परभणी पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. मात्र, त्याला न जुमानता अनेक तरुणांनी दारू पिल्यानंतर वाहने चालवली. त्याचा फटका त्यांना बसला आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 61 वर मोठ्या प्रमाणात दारू पिऊन गाड्या लावणाऱ्या तरुणांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले.
हेही वाचा - परभणीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात, रब्बी पिकांचे मोठे नुकसान
यामध्ये प्रामुख्याने जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड, पाथरी रोड या भागासह शहरातील किंग कॉर्नर व ग्रँड कॉर्नर आदी भागात कारवाई करून 24 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आता त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई होईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली आहे. या शिवाय जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत देखील दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 9 गुन्हे दाखल झाले असून जिल्ह्यात एकूण 33 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.