महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टंचाईतून दिलासा..! 'दुधने'च्या पाण्याचे शेतकऱ्यांनी केले जलपूजन - parbhani Farmers

प्रचंड पाणी टंचाईच्या परिस्थितीत निम्न-दुधना प्रकल्पातून सोडलेले पाणी परभणीकरांसाठी अमृततुल्य झाले आहे. अशा या पाण्याचे आज रविवारी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे जाऊन परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह पूजन केले.

पूजन करताना शेतकरी

By

Published : Jun 2, 2019, 4:51 PM IST

परभणी - प्रचंड पाणी टंचाईच्या परिस्थितीत निम्न-दुधना प्रकल्पातून सोडलेले पाणी परभणीकरांसाठी अमृततुल्य झाले आहे. अशा या पाण्याचे आज रविवारी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे जाऊन परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह पूजन केले. तसेच उद्या सोमवारी परभणी तालुक्यातील झरी येथे देखील शेतकर्‍यांच्या वतीने या पाण्याचे पूजन केले जाणार आहे.

डॉ.राहुल पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह पूजन केले

परभणी व जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न-दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यासाठी काल शनिवारी सायंकाळी ५ वाजता नदीपात्रातून १५ दलघमी पाणी सोडण्यात आले. गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यावरून दोन्ही जिल्ह्यात राजकारण पेटले होते. यामुळे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांचा वाद होत होता. परंतु, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आमदार डॉ. राहुल पाटील व जिल्ह्यातील शेतकरी यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली शिष्टाई फळाला आली.

निम्न-दुधना प्रकल्पातून सोडलेले पाणी

ताशी ६ हजार क्युसेक्स मिटर या वेगाने निम्न-दुधना धरणातील पाणी परभणी जिल्ह्याच्या दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आदींनी जल्लोष केला. या पार्श्वभूमीवर आज रविवारी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील नदीपात्रात असंख्य शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते जलपुजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, जि.प. सदस्य गजानन देशमुख, उपतालुकाप्रमुख महेश मठपती, राजेश परिहार, ए.सी. देशपांडे, संतोष गायकवाड, पं.स. गटनेते गोपीनाथ झाडे, पं.स. सदस्य साहेब गरुड, डॉ. प्रमोद देशमुख, संदीप झाडे, शेतकरी संघटनेचे बालासाहेब आडणे, भगवान मुळे, राजेश कच्छवे यांच्यासह लाभार्थी गावांचे सर्व सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details