परभणी- गेल्या तीस वर्षांपासून परभणी विधानसभा मतदारसंघावर वर एक हाती सत्ता असणाऱ्या शिवसेनेने यंदा देखील भगवा फडकवला आहे. या वेळचा विक्रम म्हणजे शिवसेनेने तब्बल 60 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून सर्व विरोधी पक्षांना धोबीपछाड दिला आहे. त्याहून विशेष बाब म्हणजे आमदार पाटील यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले आहेत.
परभणीत आमदार राहुल पाटील यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त - महाराष्ट्र इलेक्शन रिजल्ट
तीस वर्षांपासून परभणी विधानसभा मतदारसंघावर वर एक हाती सत्ता असणाऱ्या शिवसेनेने यंदा देखील भगवा फडकवला आहे. या वेळचा विक्रम म्हणजे शिवसेनेने तब्बल 60 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून सर्व विरोधी पक्षांना धोबीपछाड दिला आहे. त्याहून विशेष बाब म्हणजे आमदार पाटील यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या झाल्या असून, यामध्ये विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांना सुमारे साठ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्यांदा परभणी विधानसभा मतदार संघावर विजय झालेल्या आमदार पाटील यांच्याविरोधात अपक्ष तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे, एमआयएमचे उमेदवार आली खान तसेच काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांनी निवडणूक लढवली. मात्र, यापैकी एकाही उमेदवाराला आमदार पाटील यांच्या एकचतुर्थांश देखील मते मिळाली नाहीत.
त्यामुळे या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या विषयावर प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. पाटील यांनी विजय परभणीत गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची पावती असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेचे खासदार व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय मिळाल्याचेही ते म्हणाले.