महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीच्या कृषी विद्यापीठात डॉ. अब्दुल कलाम प्रेरणा केंद्राची स्थापना; व्याख्यानांचा संग्रह - parbhani vasantrao naik agricultural university

प्रेरणा केंद्राची स्‍थापना ग्रंथालयातील स्‍वतंत्र कक्षात करण्‍यात आली असून, यात दहा संगणकासह हेडफोनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात केवळ माजी राष्‍ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी व्‍याख्‍यानाचा संग्रहीत चित्रफिती ठेवण्‍यात आल्या आहेत.

dr a p j abdul kalam prerna kendra establish in parbhani vasantrao naik marathwada agricultural university
dr a p j abdul kalam prerna kendra establish in parbhani vasantrao naik marathwada agricultural university

By

Published : Aug 19, 2020, 8:01 PM IST

परभणी - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात माजी राष्‍ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रेरणा केंद्राची स्‍थापना करण्‍यात आली. स्‍वातंत्र्य दिनाचे औचित्‍य साधुन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते केंद्राचे उदघाटन करण्‍यात आले. या केंद्रात केवळ अब्दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी व्‍याख्‍यानाच्या संग्रहित चित्रफिती ठेवण्‍यात आल्या असून, त्‍यांच्‍या ग्रंथसंपदाचा संग्रह करण्यात आला आहे.

या केंद्राच्या उद्घाटनपर कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ.अशोक ढवण म्‍हणाले, की 'एका चांगल्‍या व्‍याख्‍यानाने व्‍यक्‍तीचे आयुष्‍य बदलू शकते. माजी राष्‍ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्‍या व्‍याख्‍यानात आदर्श समाज घडविण्‍याची ताकद आहे. व्‍यक्‍तीतील उच्‍च बौद्धिक और नैतिक व्यक्तिमत्व समाजास दिशा देण्‍याचे कार्य करते. परभणी कृषी विद्यापीठातून अनेक अधिकार व कृषी विस्‍तारक घडतात; परंतु त्‍यांची नितीमत्‍ता चांगली असेल तर समाजाचे चित्र बदलु शकते. डॉ.अब्दुल कलाम यांचे देशाप्रती व कामाप्रती असलेला त्‍याग आपला समोर आदर्श ठेवुन प्रत्‍येकाने कार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक एन.एस.राठोड, प्राचार्य डॉ.सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ.उदय खोडके, प्राचार्या डॉ.जयश्री झेंड, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ.संतोष कदम, डॉ. राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रेरणा केंद्राची स्‍थापना ग्रंथालयातील स्‍वतंत्र कक्षात करण्‍यात आली असून, यात दहा संगणकासह हेडफोनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात केवळ माजी राष्‍ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी व्‍याख्‍यानाचा संग्रहीत चित्रफिती ठेवण्‍यात आले आहेत. त्‍यांच्‍या ग्रंथसंपदाचा संग्रह केलेला आहे. सदरील ग्रंथसंपदा ग्रंथालय परिचराक मुंजाजी शिंदे यांनी या केंद्रास भेट दिली आहे.

विद्यापीठातील विद्यार्थी आपला अभ्यासातुन तणाव कमी करण्‍यासाठी काळी वेळेसाठी सदरिल प्रेरणा केंद्रात येऊन अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी व्‍याख्‍याने एैकु शकतील, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांची स्‍वतंत्र संकेतस्‍थळाची निर्मिती करण्‍यात आली, अशी माहिती विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. संतोष कदम यांनी दिली. यावेळी डाॅ.संतोष फुलारी, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. वंदना जाधव, मोहन झोरे, मुंजाजी शिंदे आदीसह ग्रंथालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details