महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'दिवे' लावा पण फ्रिज, एसी, टीव्ही चालू ठेवून - जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर - 'दिवे' लावा पण फ्रिज, एसी, टीव्ही चालू ठेवून - परभणी जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर

रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे स्वेच्छेने घरातील सर्व लाईट्स बंद करून दरवाजा किंवा बाल्कनीत मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावा. हे करत असताना घरातील इतर उपकरणे जसे की फ्रीज, एसी, टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे नेहमी प्रमाणे चालू ठेवावीत, असे आवाहन परभणीचे जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

Deepak Mugalikar
दीपक मुगळीकर

By

Published : Apr 4, 2020, 11:53 PM IST

परभणी- रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे स्वेच्छेने घरातील सर्व लाईट्स बंद करून दरवाजा किंवा बाल्कनीत मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावा. मात्र हे सर्व करीत असतांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडू नका. तसेच कोणीही रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी एकत्र जमायचे नाही. महत्त्वाचे म्हणजे हे करत असताना घरातील इतर उपकरणे जसे की फ्रीज, एसी, टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे नेहमी प्रमाणे चालू ठेवावीत, असे आवाहन परभणीचे जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

'कोरोना' व्हायरसचे संकट संपूर्ण जगात आहे. त्यामुळे या विरोधात स्व:विलगीकरण, सामाजिक अंतर राखण्याची कृती करुन निर्धारपूर्वक लढण्याचे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी 5 एप्रिल या दिवसाची निवड केली आहे. 'कोरोना' मुळे निर्माण झालेल्या संकटापासून दूर जाण्याचे सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लॉकडाऊनची घोषणा देशात व राज्यात करण्यात आली आहे. या काळात परभणी जिल्हयातील जनतेने मोठे सहकार्य केले आहे. परभणी जिल्हयातील जनतेने 22 मार्चला जनता कर्फ्यूचे 100 टक्के पालन केले. त्यानंतर आता उद्या रविवारी अर्थात 5 एप्रिलला रात्री 9 वाजता परभणी जिल्हयातील जनतेने स्वेच्छेने 9 मिनिटे द्यायची आहेत.

यावेळी घरातील सर्व लाईट्स (विद्युत दिवे) स्वेच्छेने बंद करून बाल्कनी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावा. तथापि, हे करत असतांना रस्त्यावरील पथदीवे, घरातील फ्रीज, एसी, टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे बंद करु नयेत. रहिवाश्यांनी घरातील इतर सर्व उपकरनांचा वापर नेहमी प्रमाणे चालू ठेवावा व काहीही काळजी करु नये, असे देखील आवाहन जिल्हादंडाधिकारी मुगळीकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details