परभणी- कोरोना विषाणूच्या लढाईत अगदी पुढच्या रांगेत उभे राहून लढणाऱ्या परभणी जिल्ह्यातील आरोग्य आणि पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) व इंडियन होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाद्वारे सुचवलेले होमिओपॅथिक औषध 'आर्सेनिकम अल्बम-30' या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
कोरोना तसेच अन्य संसर्गजन्य आजारात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपॅथिक औषध उपयोगी पडत असल्याने केंद्रीय आयुष मंत्रालयानेदेखील याचा वापर करण्याची सुचना केली आहे. सध्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. या दोन घटकांची रोगप्रतिकारकशक्ति वाढावी म्हणून जिल्ह्यातील 1 हजार आशा वर्कर्सना हे औषध देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकर देशमुख यांच्याकडे ते सुपूर्द केल्याची माहिती होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) चे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी दिली. यावेळी आयएचएमए सदस्य डॉ.आशा चांडक, चंद्रकांत अमिलकंठवार, राजेश्वर वासलवार, गोपाल मुरक्या, डॉ.शिरतुरवार, उदावंत यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. चांडक यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधी, त्याचे फायदे, पथ्य व मात्रा, औषधी कसे घ्यायचे, या विषयी मााहिती दिली. तसेच यापूर्वी जिल्ह्यातील जवळपास 2 हजार पोलीस कर्मचारी, 600 मनपा सफाई कामगार, 1 हजार 700 अंगणवाडीताई, 1 हजार 40 आशा वर्कर तसेच काही पत्रकार आणि वृत्तपत्र वाटप करणाऱ्या बांधवांना देखील या आर्सेनिक अल्बम-30 चे डोसेस देण्यात आले असल्याचेही डॉ. चांडक यांनी सांगितले.
कसे घ्यावे औषध