परभणी -कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे सर्व व्यवहार बंद ठप्प झाले आहेत. परिणामी कामगार तथा गरीब कुंटुंबांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सुभाष रोडवरील बालाजी मंदिर सेवा समितीचे महंत अखिलेशदास बाबा व स्वयंसेवकांच्या वतीने शहरात तब्बल 12 हजार 300 अन्न-धान्याच्या किट वाटप करण्यात आल्या आहे. या अंतर्गत आज मंगळवारी परभणीच्या बसस्थानकावर ऑटो रिक्षाचालकांना सुमारे 100 किटचे वाटप करण्यात आले.
परभणीत बालाजी मंदिरकडून मदतीचा हात; तब्बल 12 हजार 300 रेशन किटचे वाटप - News about Corona virus
परभणीतील बालाजी मंदिरकडून मजूर आणि गरीब कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. आता पर्यंत मंदिरकडून 12 हजार 300 रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे.
महाभयंकर आशा कोरोनाच्या विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दीड महिन्यापासून ही परिस्थिती कायम आहे. रोजगार नसल्याने बहुतांश कामगार आणि गोरगरिबांच्या घरातील चूल पेटणे बंद झाले आहे. अनेक स्वयंसेवी संघटना यासाठी पुढे येत आहेत. त्याप्रमाणेच शहरातील सुभाष रोडवरील बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने शहरातील झोपडपट्टी भागातील कुटुंबांना असंघटित कामगार आणि बेरोजगारांच्या घरी जाऊन त्यांना 8-10 दिवस पुरेल असे गव्हाचे पीठ, तांदूळ, साबण, तेल, साखर, चहा पत्ती, मिरची, हळद, मीठ आदी साहित्य असलेली किट दिले जात आहेत. समिती च्यावतीने आत्तापर्यंत बेलेश्वर नगर, सुंदर नगर, भीम नगर, साईबाबा नगर, सहारा नगर, विकास नगर, साखला प्लॉट, बस स्टॅन्ड, परसावत नगर, भजन गल्ली, गवळी गल्ली, खालसा नगर, उघडा महादेव, हडको परिसर, जबरेश्वर मंदिर, प्रबुद्ध कॉलनी, शांतीनिकेतन कॉलनी, त्रिमूर्ती नगर, जुना पेडगाव रोड, गोरक्षण, सरकारी दवाखाना आदी परिसरासह कडगाव या ठिकाणी तब्बल 12 हजार 300 धान्याच्या किट वाटप केल्या असल्याची माहिती महंत अखिलेश्वरदास बाबा यांनी दिली.
सेवेसाठी समितीचे प्रकाश बंग, दिनेश अग्रवाल, रामदेव ओझा, गोविंद झंवर, परीक्षित वट्टमवार, वेदांत कल्याणकर, शुभम आग्रवाल, संजय अग्रवाल, संतोष झंवर आदी प्रमुख स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. दरम्यान आज मंगळवारी परभणी शहरातील बस स्थानकावर शहरातल्या 100 ऑटो रिक्षाचालकांना धान्याच्या किट सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत महंत अखिलेश्वरजी बाबा यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. यावेळी सेवा समितीचे सदस्य व ऑटो संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे व पदाधिकारी उपस्थित होते.