परभणी - परभणी पोलीस दलाने दरोडेखोरांची टोळी पकडून त्यांच्याकडून 12 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले. याशिवाय 'मोक्का', 'एमपीडीए' या सारख्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई केल्याबद्दल पोलीस महासंचालकांनी परभणीतील पोलिसांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे. याबद्दल त्यांच्यासह इतर काही यशस्वी तपास करणाऱ्या पोलिसांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सन्मान केला.
दरोडेखोरांच्या टोळींसह 'मोक्का'चे आरोपी अटकेत टाकणाऱ्या परभणी पोलिसांचा सन्मान
नानलपेठ पोलिसांनी पोस्को अंतर्गत योग्य तपासणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा मिळवून दिले आहे.
परभणी पोलिसांनी पाथरी तालुक्यात घडलेल्या एका गुन्ह्यात दरोडेखोरांची संपूर्ण टोळी अटक करून चोरीला गेलेल्या १२ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले. याशिवाय स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत मोक्का कलमाखाली ४ आणि 'एमपीडीए' या गुन्ह्याअंतर्गत ४ आरोपी निष्पन्न करून पूर्णेचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी त्या आरोपींना गजाआड केले. याशिवाय नानलपेठ पोलिसांनी पोस्को अंतर्गत योग्य तपासणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा मिळवून दिले आहे. या सर्व कामगिरीबद्दल येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यावतीने सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व सत्कार करून गौरव करण्यात आला.
'या' अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव आणि सन्मान करण्यात आला, त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पूर्ण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष राठोड, प्रणिता बाभळे तर खडतर सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह दिलेल्या गणेश कदम, सुग्रीव केंद्रे, नारायण आवटे, शेख आयुब, सय्यद मोइन, असदुल्ला शहा, शिवाजी मोरे, जावेद पठाण, सतीश खाडे, सखाराम विरकर, बबन शिंदे, बालाजी फड, मुजीब जफर, रवींद्र भूमकर, बाजीराव निकाळजे, उत्कृष्ट तपास केल्याबद्दल इक्बाल शेख, मुंडे, निळे, अनिल शिंदे, भदर्गे, चंद्रकांत पवार, मिर्झा बेग, मंगेश जुकटे, विष्णू भिसे, पी.आर. कपूरे, निलेश भुजबळ, समशोद्दीन फारुकी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, किशोर नाईक व अरुण पांचाळ यांचा समावेश आहे.