परभणी - पाथरीकरांकडे साई जन्मभूमी संदर्भात 29 पुरावे आहेत, असे त्यांचे म्हणने आहे. त्या प्रमाणेच सेलू येथील व्यंकुशा अर्थात बाबासाहेब महाराज मंदिर संस्थांकडेसुद्धा साईबाबा आणि बाबासाहेब महाराज यांच्या गुरु-शिष्य नात्या संदर्भात 22 ठोस पुरावे आहेत. त्यामुळे जन्मभूमीला पाठिंबा म्हणून साईबाबांच्या गुरु स्थानापासून(सेलू) जन्मस्थान असलेल्या पाथरीपर्यंत 24 किलोमीटरची सर्वपक्षीय पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. या दिंडीचे नेतृत्व सेलू-जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर करणार आहेत.
साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरी आहे हे त्रिवार सत्य आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोणाच्या शिफारशींची गरज नाही. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. पाथरीचे साईबाबा आणि सेलू येथील बाबासाहेब महाराज यांचे गुरू-शिष्याचे नाते देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे बाबासाहेब महाराजांच्या मंदिरातून सर्वपक्षीय दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 7 वाजता ही यात्रा मंदिरातून प्रारंभ होणार आहेत, बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली. यावेळी बाबासाहेब महाराज मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. बोर्डीकर यांनी दिली.