महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिक्की घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान

मुंडे म्हणाले,की भाजप सरकारच्या १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी पुराव्यानिशी बाहेर काढले. माझा एकही पुरावा सरकार खोटे ठरवू शकला नाही. पोषण आहार आणि चिक्कीच्या घोटाळ्याचे पुरावे मी सभागृहात मांडले. ते न्यायालयाने देखील मान्य केले आहेत. त्यामुळे चिक्कीचे कंत्राट रद्द करण्यात आले.

धनंजय मुंडे

By

Published : Apr 13, 2019, 1:07 PM IST

परभणी - तुमच्या चिक्की आणि मोबाईल घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर केला. ते जिंतूर येथील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे आहेत, असा आरोप काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.

जिंतूरच्या सभेत बोलताना धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, की पंकजा मुंडे यांनी आमदार विजय भांबळे आणि माझ्यावर तोडपाणी करणारे आमदार म्हणून टीका केली, असे असेल तर तुमच्या अध्यक्षतेखाली माझी चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पण, तुमच्या चिक्की घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या.

मुंडे म्हणाले,की भाजप सरकारच्या १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी पुराव्यानिशी बाहेर काढले. माझा एकही पुरावा सरकार खोटे ठरवू शकला नाही. पोषण आहार आणि चिक्कीच्या घोटाळ्याचे पुरावे मी सभागृहात मांडले. ते न्यायालयाने देखील मान्य केले आहेत. त्यामुळे चिक्कीचे कंत्राट रद्द करण्यात आले.

यावेळी त्यांनी परभणीचे युतीचे उमेदवार जाधव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की जाधव यांच्यासारखा धनदांडगा माणूस पुन्हा खासदार झाला तर तुमचे काही खरे नाही. त्यामुळे गरीब घरातला तरुण राजेश विटेकर यांना निवडून द्या.

ABOUT THE AUTHOR

...view details