परभणी - पैठण येथील नाथसागर शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे अर्धा फूटाने उचलले आहेत. धरणातून 18 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडलेले पाणी गुरुवारी परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाले.
परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवरील ढालेगाव व मुदगल हे दोन उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले. त्यामुळे या बंधाऱ्यांचे दोन दरवाजे उघडले आहेत. या दोन बंधाऱ्यांतून नदीपात्रामध्ये 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या लाभ क्षेत्रातील लोकांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ढालेगाव बंधारा व मुदगल बंधारा यांची साठवण क्षमता अनुक्रमे 14 दलघमी व 11 दलघमी आहे.