महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत पंचनाम्याची औपचारीकता संपली असेल तर नुकसान भरपाई देण्याची 'शेकाप'ची मागणी - demand for Indemnification in parbhani

पंचनाम्याची औपचारिकता झाली असेल तर शेतकऱ्यांचा उद्रेक होण्यापूर्वी प्रत्यक्ष नुकसान भरपाई वाटप करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली.

पिक

By

Published : Nov 14, 2019, 2:36 AM IST

परभणी - परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यातील पिकांची अक्षरश: धूळधाण केली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात 100 टक्के नुकसान असताना प्रशासन मात्र पंचनाम्याचा घोळ घालत आहे. यात मोठ्या प्रमाणात दिवस वाया घातले, आता तरी पंचनाम्याची औपचारिकता झाली असेल तर शेतकऱ्यांचा उद्रेक होण्यापूर्वी प्रत्यक्ष नुकसान भरपाई वाटप करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली.

शेकापचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा -शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याचे आदेश, ६ दिवसांपासून होते हॉटेल रिट्रीटमध्ये

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता अशा परिस्थीतीत शासनाने शेतकऱ्यांना व शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना सरसकट नुकसान भरपाई व पिक विमा तात्काळ वाटप करणे अपेक्षीत आहे. मात्र, असे असतांना सुध्दा प्रशासनाने मात्र पंचनाम्याचा घोळ घालून मदत मिळवून देण्यास विलंब केला. दरम्यान, शेतावर पंचनामे करतांना पेपरमध्ये असंख्य फोटोसुध्दा पहायला मिळाले; परंतु आता जर का प्रशासनाची पंचनाम्याची औपचारीकता संपली असेल तर किमान आतातरी शेतकऱ्यांना व शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना नुकसान भरपाई तातडीने वाटप करावी. आजमितीला जिल्ह्यातील ग्रामीण जनता अतिशय कठीण परिस्थीतीत आणि नैराश्यतून दिवस काढीत आहे. त्यांचा आणखी अंत पाहणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी कष्टकऱ्यांच्या उद्रेकाची वाट पाहु नये, एवढीच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे, पंढरीनाथ मुळे, नामदेव लोखंडे, मनोहर काळे, रामभाऊ गवते, रामराव पंदूरे, गुणाजी परसे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा -सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मोहन भागवतांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details