परभणी - येलदरी जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नितिन बनाटे असे या 26 वर्षीय मृत युवकाचे नाव असून, ते जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी चंद्रकांत बनाटे यांचे पुत्र होते.
येलदरी जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - येलदरी जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
येलदरी जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नितिन बनाटे असे या 26 वर्षीय मृत युवकाचे नाव असून, ते जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी चंद्रकांत बनाटे यांचे पुत्र होते.

तब्बल १० ते १२ वर्षानंतर प्रथमच येलदरी जलाशय भरला आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण 2006 पासून पहिल्यांदाच 96 टक्के भरले आहे. या जलाशयात पोहण्यासाठी आज दुपारी २ च्या सुमारास २ तरुण गेले होते. परंतू, दुर्देवाने नितीन बनाटे हा जलशयातील सखोल पाण्यात जाऊन बुडला. २ तासानंतर त्याचा शोध लागला. धरणात 96 टक्केच्या वर पाणीसाठा आहे. त्यामुळे नितीनचा मृतदेह शोधताना मच्छीमार तुकाराम गव्हाणे यांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, नितीनचा मृतदेह येलदरीहून जिंतूर शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.