परभणी - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परभणी जिल्ह्यात प्रशासनाने आठ दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. मात्र, आज (गुरुवारी) पहिल्या दिवशी परभणी शहरातील सर्व प्रतिष्ठाने आणि दुकाने कडकडीत बंद असली तरी रस्त्यावरची वाहतूक अर्थात रहदारी नेहमीप्रमाणे सुरूच असल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपुर्ण संचारबंदी करणारे जिल्हा प्रशासन, मनपाचे अधिकारी तसेच पोलीस देखील या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेही रस्त्यावर दिसून आले नाहीत, हे विशेष.
जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदीची घोषणा केली. त्यानुसार काल (बुधवारी) संध्याकाळी सात वाजता लागू झालेली ही संचारबंदी १ एप्रिलच्या पहाटे ६ वाजेपर्यंत कायम असणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असली तरी अन्य सर्व दुकाने, प्रतिष्ठाने आणि सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात १ हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर सुमारे 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर बनत असल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय लागू केला आहे.
परभणीच्या संचारबंदीत फक्त दुकाने बंद; रहदारी सुरूच - परभणी कोरोना अपडेट
जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदीची घोषणा केली. त्यानुसार काल (बुधवारी) संध्याकाळी सात वाजता लागू झालेली ही संचारबंदी १ एप्रिलच्या पहाटे ६ वाजेपर्यंत कायम असणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असली तरी अन्य सर्व दुकाने, प्रतिष्ठाने आणि सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत.
दरम्यान, सकाळी नऊ वाजेपर्यंत दूध व्यवसायिकांना घरोघरी फिरून दुध वाटप करण्याची मुभा देण्यात आल्याने रस्त्यावर दूध विक्रेत्यांची वाहने फिरताना दिसून आली. मात्र याशिवाय सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात वाहनांवर फिरताना दिसून आले. अनेक ठिकाणी ऑटोमध्ये बसून जाणारे प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात दिसत होते. विशेषतः स्टेशन रोड, बस स्टँड परिसर, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि वसमत रोड आदी भागात वाहतूक अर्थात रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याचे पहावयास मिळाले.
संचारबंदीची अंमलबजावणी करणारे अधिकारी पोलीस गायब -
जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू असल्याने प्रत्येक चौकात किंवा ठिकाणी या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा व पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर वगळता अन्य कुठेही पोलीस किंवा अधिकारी संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी दिसून आले नाहीत. सकाळी दहा वाजेपर्यंत ही परिस्थिती शहरात होती. त्यानंतर सवयी प्रमाणे कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी सेवा देण्यासाठी येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत होती.
हेही वाचा -