महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील फळबागांसह तुरीच्या खळ्यांचेही नुकसान - परभणी अवकाळी पाऊस

परभणी शहरात या पावसाची 12 मिमी एवढी नोंद झाली. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 7 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. याशिवाय तालुक्यातील पिंगळी आणि जाम या गटांमध्ये अनुक्रमे 6 आणि 8 पूर्णांक 5 मिमी पाऊस पडला. त्यामुळे मांडाखळी, पेडगाव, सिंगापूर या गावांच्या परिसरातील शेतामधील संत्री, जांब, पपईच्या फळबागांचे नुकसान झाले.

parbhani
अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील फळबागांसह तुरीच्या खळ्यांचेही नुकसान; परभणीत 12 मिमी पाऊस

By

Published : Feb 3, 2020, 1:54 PM IST

परभणी -रविवारी सायंकाळी सात वाजता सुरू झालेला अवकाळी पाऊस मध्यरात्रीपर्यंत शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात बरसला. या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. शेतांमध्ये सध्या तुरीची मळणी सुरू आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे तूर आणि इतर साहित्याची नासधूस झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील फळबागांसह तुरीच्या खळ्यांचेही नुकसान; परभणीत 12 मिमी पाऊस

हेही वाचा -परभणीतील ११३ वर्षांची परंपरा असलेल्या 'उरूस' यात्रेला सुरूवात

दरम्यान, परभणी शहरात या पावसाची 12 मिमी एवढी नोंद झाली. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 7 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. याशिवाय तालुक्यातील पिंगळी आणि जाम या गटांमध्ये अनुक्रमे 6 आणि 8 पूर्णांक 5 मिमी पाऊस पडला. त्यामुळे मांडाखळी, पेडगाव, सिंगापूर या गावांच्या परिसरातील शेतामधील संत्री, जांब, पपईच्या फळबागांचे नुकसान झाले. तसेच याचा फटका तुरीच्या खळ्यांना बसला. अचानक आलेल्या पावसामुळे पसरून ठेवलेल्या तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

याशिवाय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात माखणी सर्कलमध्ये 16 मिमी पाऊस झाला. पालम तालुक्यातील पालम, चाटोरी आणि बनवस गटांमध्ये एकूण 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मानवत तालुक्यातील केकरजवळा गटामध्ये 5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या प्रमाणेच जिल्ह्यातील इतर भागांमध्ये तुरळक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण 9 तालुक्यांमध्ये सरासरी 1 पूर्णांक 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पावसाचा फटका परभणी, गंगाखेड आणि पालम तालुक्याला बसला आहे.

हेही वाचा -परभणीत फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; संपूर्ण दुकान जळून खाक

ABOUT THE AUTHOR

...view details