महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत जिल्ह्याच्या गुन्हे विषयक बातम्या फक्त एका 'क्लिक'वर - परभणी

परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अवैध धंदे चालविणाऱ्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मारलेल्या छाप्यात ७० पेक्षा अधिक आरोपींना अटक झाली असून लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

परभणी गुन्हे बातम्या

By

Published : Sep 10, 2019, 1:04 PM IST

Updated : Sep 10, 2019, 3:31 PM IST

परभणी- गणेशोत्सवाचा आड घेत परभणीत अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांवर छापा टाकत पोलिसांनी ७० हून अधिक आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. नवा मोंढा, परभणी ग्रामीण, पूर्णा तालुक्यातील चुडावा तसेच सोनपेठ, बामणी, पालम आणि पाथरी शहरात काही जुगार अड्ड्यांवर छापा टाकून जुगाऱ्याना अटक केली आहे. सर्व जुगाऱ्यांकडून २ लाख २५ हजार ५६७ रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

परभणीत जिल्ह्याच्या गुन्हे विषयक बातम्या फक्त एका 'क्लिक'वर


पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण नावाचा मटका घेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून परभणीच्या सुपर मार्केट परिसरात मटक्याचा जुगार खेळताना दोघांना अटक झाली आहे. यातून ८ हजार १३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पालम, परभणी, गंगाखेड, जिंतूर, कोतवाली, चुडावा, दैठणा, बोरी व पाथरी या पोलिस ठाणे अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकून आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परभणी-जिंतूर मार्गावर बस घसरली


परभणी-जिंतूर मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. या कामासाठी लागणाऱ्या मुरमाचा चिखल झाला असून यावरून अनेक वाहने घसरून अपघात घडले आहेत. असाच एक अपघात काल (सोमवार) घडला. तब्बल ९८ प्रवासी घेऊन निघालेली एस.टी.बस खराब रस्स्यामुळे घसरली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बचावले आहेत. बसचालक नियामत पठाण यांना अपघातानंतर भोवळ आली होता. काही वेळाने जेसीबीच्या सहाय्याने बस रस्त्यावर घेत मार्गस्थ झाली.

चाऱ्यासोबत युरिया खाल्याने 2 बैल व गाईचा मृत्यू; परभणी जिल्ह्यातील घटना


जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे युरिया खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावल्याची घटना आज (गुरुवारी) घडली आहे. पांगरी येथील शेतकरी धनंजय माधवराव घुगे यांच्या आखड्यावरील ही घटना असून आधीच दुष्काळाने परेशान झालेल्या शेतकऱ्याला हे नवीन भुर्दंड सहन करावे लागत आहे.

Last Updated : Sep 10, 2019, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details