महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला तीनशेचा टप्पा - Parbhani latest news

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 303 एवढी झाली आहे. तर यापैकी 138 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 8 जणांचा मृत्यू झाल्याने उर्वरित 157 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Parbhani corona update
परभणी कोरोना अपडेट

By

Published : Jul 16, 2020, 11:44 AM IST

परभणी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी दिवसभरात 6 रुग्ण वाढल्याने 303 वर जाऊन पोहचली आहे.आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यपरिस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात 157 जणांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या तीन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीचे तीन महिने 100 च्या आत असलेली जिल्ह्याची रुग्ण संख्या आता जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात 300 च्या वर जाऊन पोहोचली आहे. बुधवारी 6 रुग्णांची वाढ झाली आहे.

बुधवारी दुपारी आलेल्या अहवालात परभणी जिल्ह्यात परभणी शहरातील 2, सेलूतील 3, तर मानवत मधील 1 असे नवे 6 रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने तीनशेचा आकडा ओलांडला आहे. या रुग्णांमध्ये परभणी शहरातील दर्गा रोडवर असलेल्या गणेश नगरातील 39 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.या प्रमाणेच जिल्हा रुग्णालयातील यापूर्वी आढळून आलेल्या 27 महिला कर्मचाऱ्याचा दुसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर सेलू शहरात 3 आणि मानवत शहरात एका रुग्णाची भर पडली आहे. ज्यामध्ये मानवत शहरातील मेन रोडवर राहणाऱ्या 67 वर्षीय महिलेसह सेलू शहरातील सर्वोदय नगरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिला आणि 67 वर्षीय पुरुषासह 3 वर्षांच्या बालकाचा समावेश आहे

मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये परभणी शहरातील वडगल्ली येथील 52 वर्षीय महिला, सर्फराज नगर मधील 55 वर्षीय पुरुष, नानलपेठ येथील 52 वर्षीय पुरुष, सिंचन नगरातील 53 वर्षीय पुरुष तर डॉक्टर लेन भागातील खाजगी हॉस्पिटल मधील 60 वर्षीय पुरुष व काद्राबाद प्लॉट भागातील 45 वर्षीय महिलेसह गंगाखेड येथील एका 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 303 एवढी झाली आहे. तर यापैकी 138 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 8 जणांचा मृत्यू झाल्याने उर्वरित 157 रुग्णांवर आता जिल्हा रुग्णालयाच्या संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details