परभणी - संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद किरअर अॅकडमीच्या वतीने बुधवारी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांचा आक्रोश मोर्चा निघाला. राज्यभरात सध्या प्रचंड बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल निर्माण करुन नवी बेरोजगारी वाढवली, असा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता.
हेही वाचा - नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे फुगे सोडून
जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात सर्व नोकर भरती बंद ठेवली आहे. नव्या पोर्टलचे मोठ्या प्रमाणात नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे सामाजिक आणि शैक्षणिक शोषण थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद करिअर अॅकडमीच्या वतीने विविध स्तरातील विद्यार्थांना सोबत घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, प्राध्यापक विठ्ठल कांगणे, अॅड अमोल गिराम, स्वप्नील गरुड यांनी नेतृत्व केले. तर मोर्चात स्वामी विवेकानंद, संघर्ष, रिलायबल, व्हिजन, जिजाऊ, द्रोण, अभिनव, चौरे स्टडी सर्कल, ज्ञानगंगा, जिजाऊ ज्ञानतीर्थ आदी क्लासेस व स्टडी सर्कलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.