परभणी - येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे वाहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभवोतीचा कठडा तोडून आतमध्ये घुसल्याची घटना पहाटे साडेचार वाजता घडली आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. यावेळी गाडीमध्ये चार पोलीस कर्मचारी होते. सुदैवाने यापैकी कोणालाही इजा झाली नाही.
गस्तीवरील पोलीस व्हॅनची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भिंतीला धडक - पोलिसांच्या गाडीची धडक parbhani
परभणीमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला जावून धडकल्याने अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील चालकासह अन्य तीन कर्मचाऱ्यांना सुदैवाने कोणतीच इजा झाली नाही.
हेही वाचा -"मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट"
परभणी शहरात चार पोलीस ठाणे असून त्यापैकी ग्रामीण पोलीस ठाण्याचे दरोडा गस्त वाहन नियमितपणे वसमत रोड वरून गावात येत होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक अनिल गायकवाड यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला जावून धडकली. भिंत तोडून ही गाडी जवळपास तीन फूट आतमध्ये घुसली. सुदैवाने या अपघातात गाडीमधील एकाही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस मुख्यालयाला याबाबत कळवून क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. या घटनेत संरक्षण भिंतीचे नुकसान झाले. तसेच गाडीच्या पुढील बाजूचेही थोडे नुकसान झाले आहे.