परभणी - 'शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण ( Shahu Maharaj Gives Reservation ) दिले. यामध्ये मराठ्यांना देखील आरक्षण ( Maratha Reservation ) होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील ओबीसी ( Chhatrapati Shivaji Maharaj Was OBC ) होते. मात्र कालांतराने आम्ही गावातील मोठे म्हणून, काही लोकांनी आरक्षण नाकारलं. मात्र, आज अवस्था काय झाली आहे ? असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर ( Mahadev Jankar On Shivaji Maharaj ) यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, आम्ही मोठे म्हणत काहींनी आरक्षण नाकारलं - महादेव जानकर गंगाखेड येथे ओबीसी एल्गार आंदोलन
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे ओबीसी एल्गार आंदोलन ( Gangakhed OBC Elgar Protest ) सुरु आहे. या आंदोलनात गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजातील पदाधिकारी धरणे देवून बसले आहेत. या आंदोलनाला रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे ( MLA Ratnakar Gutte ), शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, बालाजी मुंडे, बाळासाहेब राखे आदींसह ओबीसीनेते व्यासपीठावर उपस्थित होते.
आमचे 30 ते 35 आमदार होऊ द्या, मग दाखवतो गंमत
यावेळी महादेव जानकर म्हणाले, आमचे 30 ते 35 आमदार होऊ द्या, मग 10 मिनिटांत ओबीसीची गंमत करून दाखवतो. मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण ( Mahadev Jankar On Muslim Reservation ) देतो. मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम, अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम, कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम दिसतो. कुठंच कलेक्टर नाही. नुसती बोंबाबोंब.
नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं ?
राज्य चालवणारा मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे. मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिले. मराठ्यांना आरक्षण होते. पण नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं ( Why reservation of Marathas gone ) ? असा सवाल करून त्यांनी छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते, असे सांगितले. शिवाय पुढे त्यांनी 'आमच्या तथाकथीत लोकांना वाटले की आम्ही गावातील लई मोठे आहोत, आम्हाला नकोय तसले आरक्षण आणि आज आवस्था काय झाली आहे', असेही शेवटी जानकर म्हणाले.