महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी मनपाच्या 'स्थायी' सह सर्वच विषय समित्यांचे सभापती बिनविरोध - सभापती निवडणूक परभणी महापालिका

महापालिकेच्या स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व पदांसाठी एकमेव उमेदवारांचे अर्ज (प्रत्येकी एक) आल्याने पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर व आयुक्त रमेश पवार यांनी निवड जाहीर केली आहे.

parbhani news
परभणी मनपा

By

Published : Feb 2, 2020, 2:22 AM IST

परभणी- येथील शहर महापालिकेच्या स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व पदांसाठी एकमेव उमेदवारांचे अर्ज (प्रत्येकी एक) आल्याने पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर व आयुक्त रमेश पवार यांनी निवड जाहीर केली आहे. दरम्यान, नवनियुक्त सर्व सभापतींचा परभणीच्या बी.रघुनाथ सभाग्रहात जोरदार सत्कार करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

परभणी मनपाच्या 'स्थायी' सह सर्वच विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

दरम्यान, या बैठकीत स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलमीर खान यांची निवड झाली. तसेच प्रभाग समिती 'अ' च्या सभापतीपदी राधिका गोमचाळे, 'ब' च्या सभापतीपदी सय्यद समरीन बेगम फारूक यांची तर प्रभाग 'क' च्या सभापतीपदी नम्रता हिवाळे यांची निवड जाहीर करण्यात आली. याशिवाय गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण समिती सभापतीपदी नागेश सोनपसारे, महिला व बालकल्याण समिती सभापती माधुरी बुधवंत, स्थापत्य समिती सभापती गवळण रामचंद्र रोडे, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती अब्दुल कलीम अब्दुल समद, विधी समिती सभापती अमोल पाथरीकर, शहर सुधार समिती सभापती शे. फरहत सुलताना शे. अ. मुजाहेद आणि माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापतीपदी विकास लंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यानंतर सर्व नूतन सभापती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, महापौर अनिता सोनकांबळे, आयुक्त रमेश पवार, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते सय्यद सामी उर्फ माजू लाला, विरोधी पक्षनेते विजय जामकर, उपायुक्त गणपत जाधव, नगर सचिव विकास रत्नपारखी, विजयराव वरपूडकर, रवींद्र सोनकांबळे, सुनील देशमुख, गणेश देशमुख, सचिन देशमुख, सचिन अंबिलवादे, गटनेते चंद्रकांत शिंदे, विशाल बुधवंत, नगरसेविका काकडे, विनोद कदम, अक्षय देशमुख, मोहम्मद शकील, नगरसेवक विजय ठाकूर, मोहम्मद फारूक, बाळासाहेब बुलबुले आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details