महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय; कुडकुडत उघड्यावर झोपण्याची वेळ - उमेदवारांची गैरसोय परभणी बातमी

राज्यातील नऊ जिल्ह्यांसाठीच्या सैन्य भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 14 जानेवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यासाठी 65 हजार उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. शुक्रवारी रात्री 12 वाजता या सैन्यभरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे.

candidates-inconvenience-who-came-for-military-recruitment-in-parbhani
candidates-inconvenience-who-came-for-military-recruitment-in-parbhani

By

Published : Jan 6, 2020, 11:36 AM IST

परभणी- शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 14 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी राज्यभरातून जवळपास 65 हजार उमेदवार येणार आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय केलेली नाही. परिणामी ते थंडीत कुडकुडत उघड्यावर रात्र काढत आहेत. काही सेवाभावी संस्थांनी सोय केली असली तरी त्याची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय

हेही वाचा-'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

राज्यातील नऊ जिल्ह्यांसाठीच्या सैन्य भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 14 जानेवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यासाठी 65 हजार उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. शुक्रवारी रात्री 12 वाजता या सैन्यभरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे. मात्र, हजारोंच्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी परिक्षार्थींना भर थंडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे हजारो उमेदवार निराशा झाल्याचे पाहायला मिळात आहे.

परभणीच्या कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 10 दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत रोज तीन जिल्ह्याच्या जवळपास पाच ते सहा हजार उमेदवारांना इथे बोलावण्यात येत आहे. पहिल्या दिवशी परभणी, बुलढाणा, नंदुरबार व वर्धा या चार जिल्ह्यातील उमेदवारांना इथे बोलावण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने हे तरुण परीक्षार्थी येथे दाखल होत आहेत. मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया ही रात्री 12 वाजता सुरू होत आहे. महत्वाचे म्हणजे इथे अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या उमेदवारांची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना रस्त्याच्या बाजूला, कुणाला फुटपाथवर तर कुणाला मैदानात व विद्यापीठाच्या विविध इमारतींच्या वरांड्यात कुडकुडत उघड्यावरच झोपावे लागत आहे. दरम्यान, शहरात काही सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थेच्यावतीने विद्यापीठ रोडवरच्या विष्णू जिंनिंगमध्ये इतर काही भागात राहण्याची व झोपण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, याची सूचना उमेदवारांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details