महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील व्यापार्‍यांना मनपाचे व्यवसाय परवाने बंधनकारक; मनपा आयुक्तांचे निर्देश - परभणी महापालिका

शहरातील प्रभाग समिती अ, ब आणि क अंतर्गत व्यवसायधारकांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे प्रकरण 22 लायसन परवाने कलम 330, 331, 315, 337 ते 378, 379,381 ते 387 कलमान्वये व्यवसायधारकांना परवाना देणे अनिवार्य आहे. त्यासाठी परवाना शुल्क आकारून हे परवाने तीन वर्षाकरीता किंवा एका वर्षासाठी वितरीत करण्यात येणार आहे.

परभणी मनपा
परभणी मनपा

By

Published : Jun 17, 2021, 9:20 PM IST

परभणी -शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व लहान, मध्यम व मोठ्या व्यवसायधारकांना व्यवसाय परवाना दिल्या जाणार आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना हे परवाने घेणे बंधनकारक असून या संदर्भात आज (गुरुवारी) आयुक्त देविदास पवार यांनी आदेश बजावले आहेत. दरम्यान, येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया राबवली जाणार असून, या कालावधीत परवाना न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त पवार यांच्या वतीने देण्यात आली आहे.

एक किंवा तीन वर्षांसाठी मिळणार परवाने

शहरातील प्रभाग समिती अ, ब आणि क अंतर्गत व्यवसायधारकांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे प्रकरण 22 लायसन परवाने कलम 330, 331, 315, 337 ते 378, 379,381 ते 387 कलमान्वये व्यवसायधारकांना परवाना देणे अनिवार्य आहे. त्यासाठी परवाना शुल्क आकारून हे परवाने तीन वर्षाकरीता किंवा एका वर्षासाठी वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी मनपातील प्रभाग समितीच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र द्यावेत, असे आदेश आयुक्त देविदास पवार, उपायुक्त प्रदीप जगताप यांनी सहायक आयुक्तांना दिले आहेत. तसेच याची अंमलबजावणी तत्काळ करण्यास सांगण्यात आले आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 169 नुसार कारवाई करण्यात येत आहे, अशीही माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे.

'या' व्यापाऱ्यांना घ्यावे लागणार परवाने

शहरातील सोने-चांदी दागिणे कारागिर, सर्व प्रकारचे भांडी विक्रेते, होम अप्लायसेन्स, जनरल स्टोअर्स, बुक सेंटर, स्टेशनरी, क्रॉकरी, लेडीज एम्पोरिअम, ऑप्टीकल्स, कॉस्मेटिक, खेळणी, बॅग, सुटकेस, लॉटरी सेंटर, धार्मिक पूजा साहित्य विक्रेता, सलून, ब्युटी पार्लर, भंगार दुकाने, गादी घर, शेती औजारे, बियाणे, फर्टिलायझर्स, कीटकनाशक औषधी, कृषि केंद्र, तट्टे बांबू विक्रेते, सर्वप्रकारचे रेडिमेड, हॅन्डलूम, होजिअरी, गारमेंट, टेलरिंग, कापड व्यापारी, सर्व क्लिनीक, दवाखाने, फिरते हातगाडेवाले विक्रेते, सर्व मोटार मेकॅनिक, गॅरेज, सर्व्हीस सेंटर, जुन्या गाड्या खरेदी-विक्री, ऑटोमोबाइल्स, मोटार ऑइल, झेरॉक्स, डीटीपी जॉबवर्क, टाईपिंगवर्क, कर सल्लागार, आर्किटेक, वास्तू कला शिल्प, चार्टट अकाऊंटट, सर्व प्रकारचे मशिनरी विक्रेते, फोटो स्टुडिओ, रक्तपेढी, सोनोग्राफी सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, संगणक विक्रेते, रिचार्ज सेंटर, वजन काटे, खासगी कोचिंग क्लासेस, शिकवणी, टायपिंग इन्स्टिट्यूट, संगणक प्रशिक्षण केंद्र, हार्डवेअर, मंगल कार्यालये, फंक्शन हॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, मोबाइल टॉवर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, गॅस एजन्सीधारक, चहा, पानटपरी, रस्त्यावरील हातगाडेवाले, कत्तलखाने, मटन, चिकन, अंडे, मासे विक्रेते, किराणा दुकान, मिठाई घर, खानावळ, भोजनालय, रसवंतीगृह आदी सर्व विक्रेत्यांना परवाना बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा -20 वर्षीय प्रिया बनलीये शववाहिकेची चालक; एक आठवड्यापासून देतीये सेवा

ABOUT THE AUTHOR

...view details