महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2020, 8:51 PM IST

ETV Bharat / state

खळबळजनक : एसटीच्या मालवाहतूक बसमधून धान्याचा काळाबाजार; गंगाखेडमध्ये रेशनचा 220 पोते गहू जप्त

परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने एसटी महामंडळाच्या माल वाहतूक करणार्‍या बसमधून काळ्या बाजारात जाणारा हा गहू पकडला आहे. या बसमधून राशनचा तब्बल 220 पोते गहू जप्त केला असून ही कारवाई आज (शुक्रवारी) गंगाखेड येथे करण्यात आली.

परभणी
परभणी

परभणी- रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या माफियांकडून आता चक्क एसटी महामंडळाची मालवाहतूक बस देखील वापरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील गंगाखेड शहरात परभणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एक मालवाहतूक करणारी एसटी बस अडवून त्या बसमधील तब्बल 220 गव्हाची पोती जप्त केली आहेत. हा माल परळी येथून नांदेडच्या काळ्या बाजारात जात होता.

परभणी

परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने एसटी महामंडळाच्या माल वाहतूक करणार्‍या बसमधून काळ्या बाजारात जाणारा हा गहू पकडला आहे. या बसमधून राशनचा तब्बल 220 पोते गहू जप्त केला असून ही कारवाई आज (शुक्रवारी) गंगाखेड येथे करण्यात आली.

गुप्त माहितीवरून लावला होता सापळा

या संदर्भात विशेष पोलीस पथकातील फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांना एसटी महामंडळाच्या मालवाहूतक बसमधून रेशनच्या गव्हाची वाहतूक होत करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना सांगितली. तेव्हा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे फौजदार खोले, पवार यांच्यासह कर्मचारी यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, दीपक मुदीराज, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, विष्णू भिसे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानुसार या पथकाने आज (शुक्रवारी) गंगाखेड शहरातील नांदेड रस्त्यावर सापळा लावला होता. यावेळी परळीकडून नांदेडकडे मालवाहतूक करणारी बस (क्र एमएच 20 बीएल 0067) अडवण्यात आली.

'तहसील प्रशासनाच्या सहकार्याने होत आहे चौकशी'

सदर गाडी अडवून या गाडीची पथकाने तपासणी केली, त्यावेळी त्यात गव्हाची पोती आढळली. सर्व 220 पोत्यांमध्ये रेशनचा गहू असल्याचे त्यांना दिसले. याबाबत अधिक चौकशी पथकातील अधिकारी कर्मचारी करीत आहेत. 'तो गहू नेमका कोणाचा होता व कुठे जात होता, आदी प्रश्नांची उकल तहसील प्रशासनाच्या सहकार्याने हे पथक करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details