परभणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या दौऱ्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपच्या वतीने प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यानुसार शनिवारी परभणीतील पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी या चारही विधानसभासाठी 51 इच्छुकांच्या पक्ष निरीक्षक तथा राज्यमंत्री संजय भेगडे यांनी मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे भाजप कुठेतरी स्वातंत्र्य लढण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते.
परभणीच्या चारही विधानसभा मतदार संघासाठी भाजपने घेतल्या 51 इच्छूकांच्या मुलाखती हेही पाहा - सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे 17 नगरसेवकांसह भाजपवासी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश
मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमध्ये प्रामुख्याने पाथरी विधानसभेतून विद्यमान आमदार मोहन फड, गंगाखेडसाठी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विजय गव्हाणे, बालाजी देसाई, परभणीसाठी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. मीना परतानी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, त्यांची कन्या मेघना बोर्डीकर आणि माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा समावेश आहे.
या इच्छुकांनी दिल्या मुलाखती -
पाथरी विधानसभा मतदार संघासाठी आमदार मोहन फड, प्रा.पी.डी.पाटील, डॉ.मंजूषा चौधरी, शाम गलबे पाटील, बाबासाहेब फले, महादेव गिरे, रंगनाथ सोळंके, दत्तात्रय कदम, शिवाजी मव्हाळे, रमाकांत जहागीरदार, डॉ.उमेश देशमुख, हनुमान सावंत, गंगाखेड विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, सुरेश भुमरे, शामसुंदर मुंडे, लिंबाजी भोसले, अनंत बनसोडे, रमेश गोळेगांवकर, रामकिशन रौंदळे, विश्वनाथ सोळंके, विठ्ठल रबदडे, सुभाष कदम, विजय गव्हाणे, रामप्रभू मुंडे, गणेश रोकडे, डॉ.रामराव केंद्रे, गणेश घोरपडे, डॉ.बडेसाब शेख तर परभणी विधानसभा मतदार संघासाठी शहराध्यक्ष आनंद भरोसे, डॉ.मीना परतानी, मोहन कुलकर्णी, मंगल मुद्गलकर, अभिजीत धानोरकर, चंद्रकांत चौधरी, सुनिल देशमुख, रमेश गोळेगांवकर, शंकर भालेकर, अजय गव्हाणे तसेच जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे बोर्डीकर, समीर दुधगांवकर, गणेश काजळे, डॉ. माधव सानप, संजय साडेगांवकर, शशीकांत देशपांडे, राजेश वट्टमवार, खंडेराव आघाव, डॉ.गुलाब सांगळे, जिजाराव गिते आणि अशोक खताळ यांनी मुलाखती दिल्या.