महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी: भाजपचे 'झुणका भाकर' आंदोलन; शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी - आमदार मेघना बोर्डीकर बातमी

भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाविकासघाडीच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजपचे आंदोलन
भाजपचे आंदोलन

By

Published : Nov 13, 2020, 7:01 PM IST

Updated : Nov 13, 2020, 7:41 PM IST

परभणी- जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा करुन आर्थिक मदत करू अशी घोषणा राज्य सरकारद्वारे करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात दिवाळी आली तरीही शेतकर्‍यांच्या खात्यात अजून दमडीही जमा झालेली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने गोड दिवाळी कडू केल्याचा आरोप करत भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झुणका भाकर खाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.


भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाविकासघाडीच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजपचे 'झुणका भाकर' आंदोलन



'जिल्ह्यातील 16 मंडळ मदतीपासून वंचित'

यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, उडीद व कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चाच्यावतीने जिल्हाभरात दौरे करून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याबाबत निवेदने देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व शेकर्‍यांना सरसकट आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. सरकारने जिल्ह्यातील 16 मंडळांना मदतीपासून वंचित ठेवले. या संवेदनाहीन सरकारला शेतकर्‍यांच्या परिस्थितीची जाणीव नसल्याचा आरोप यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला.


'...म्हणून झुणका भाकर आंदोलन'

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करु, अशी घोषणा सरकारद्वारे करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात दिवाळी आली तरीही शेतकर्‍यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा झाली नाही. सरकारच्या आर्थिक मदतीची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झाली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी कुठलेही गोड-धोड झालेले नाही. त्यांच्या परिस्थितीची प्रतिकात्मक आठवण म्हणून झुणका-भाकर खाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध करत हे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, प्रमोद वाकोडकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उध्दवराव नाईक, बाळासाहेब भालेराव, सुभाष आंबट, रंगनाथराव सोळंके, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

Last Updated : Nov 13, 2020, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details