महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत ७ मोटार सायकलसह चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - परभणी स्थानिक गुन्हे शाखा बातमी

परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकांना फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावरुन पोलिसांच्या कारवाईत मोटारसायकल चोरटे सापडले आहेत.

परभणीत ७ मोटार सायकलसह चोरटे जेरबंद

By

Published : Nov 12, 2019, 8:23 PM IST

परभणी -परभणीसह जालना जिल्ह्यातील काही भागातून मोटार सायकली चोरुन त्या विक्री करणाऱ्या चोरट्याला सात मोटरसायकलसह पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन या आरोपीला सापळा रचून पाथरी तालुक्यात पकडण्यात आले आहे. तसेच त्याच्यासोबतच मोटार सायकली खरेदी करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी जेरबंद केले.

परभणीत ७ मोटार सायकलसह चोरटे जेरबंद

हेही वाचा-आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकांना फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पथकामार्फत पेट्रोलिंग करत असताना गणेश काशिनाथ गायकवाड ( वय २० वर्ष) हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी बसस्थानक परिसरात आला असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल बाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा ती मंठा येथून चोरल्याची कबुली त्याने दिली. त्याच बरोबर अधिक चौकशीत गणेश याने मंठा, परतुर, मानवत, सेलू येथुनही मोटार सायकल चोरल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कसून चौकशी केली असता, आरोपीने सेलू शहरातून चोरी केलेली मोटार सायकल त्याने जवळा जुट्टा (ता. पाथरी) येथील अंगद आश्रोबा जुट्टे यास विक्री केल्याचे उघडकीस आले. यावरुन पथकाने अंगद आश्रोबा जट्टे यास सेलू कॉर्नर, पाथरी येथून सापळा रचून ताब्यात घेतले.

दरम्यान, या आरोपीने मानवत, सेलू व जालना जिल्ह्यातील मंठा, परतुर, जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार सायकल चोरल्या असून त्यासंबंधी त्याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या चोरट्याच्या चौकशीत सर्व मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. त्या सेलू पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत. या मोटार सायकलची किंमत १ लाख ३७ हजार एवढी आहे. तर मानवत येथून चोरी केलेली मोटार सायकल त्याने खेडुळा पाटीच्या जवळील एका शेतातील विहिरीत टाकली होती.
या प्रकरणी आरोपी गणेश गायकवाड व अंगद जट्टे यांना पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास सेलू पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, पोलीस निरिक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रिव केंन्द्रे, निलेश भुजबळ, जमिर फारूखी, शंकर गायकवाड, अरूण कांबळे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details