परभणी- पेडगाव येथे रेल्वेच्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने जवळपासच्या 20 गावांची रहदारी ठप्प होत आहे. शेतकऱ्यांची कामे खोळंबत असल्याने रेल्वे तसेच जिल्हा प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, यासाठी वारंवार निवेदन देवूनही प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी याच पाण्यात उतरून तब्बल सहा तास बोंबमारो आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्त्यासाठी अर्धनग्न बोंबमारो आंदोलन - राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्त्यासाठी आंदोलन
परभणी तालुक्यातील पेडगाव रेल्वे स्टेशन जवळील मोहपुरी, गव्हा, आळंद, भोगाव व इतर १५ ते २० गावांना जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलात ५ ते ६ फुट पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे या गावांची वाहतुक पुर्णपणे बंद होत आहे
परभणी तालुक्यातील पेडगाव रेल्वे स्टेशन जवळील मोहपुरी, गव्हा, आळंद, भोगाव व इतर १५ ते २० गावांना जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलात ५ ते ६ फुट पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे या गावांची वाहतुक पुर्णपणे बंद होत आहे. या गावांना वाहतुकीसाठी हा एकमेव मार्ग असल्याने गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मागील ६ महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पर्यायी रस्त्याची मागणी केली जात आहे.
रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन याची दखल घेत नसल्याने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी दिवाळीच्या उत्सवात रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात बोंबमारो आंदोलन केले. ६ तास चाललेले हे आंदोलन आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मध्यस्थीने जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी यांच्यात चर्चा करून स्थगित करण्यात आले.