महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी: 566 ग्राम पंचायत निवडणुकीसाठी 12 हजार 807 उमेदवारांचे अर्ज वैध - Parbhani update

परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी पार पडली. यात एकूण 145 उमेदवारी अर्ज अवैध ठरले तर 12 हजार 807 अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवारी) संध्याकाळी दिली.

ग्राम पंचायत निवडणूक
ग्राम पंचायत निवडणूक

By

Published : Jan 1, 2021, 9:04 PM IST

परभणी - जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यासाठी 13 हजार 63 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 145 जणांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीसाठी 12 हजार 807 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

'23 ते 30 डिसेंबर दरम्यान इच्छुकांनी भरले अर्ज -

परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी पार पडली. यात एकूण 145 उमेदवारी अर्ज अवैध ठरले तर 12 हजार 807 अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवारी) संध्याकाळी दिली. जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 23 ते 30 डिसेंबर दरम्यान इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. शेवटच्या दिवशी (बुधवारी) एकूण 13 हजार 63 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

'परभणी तालुक्यात 2 हजार 21 उमेदवार -

परभणी तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी 2 हजार 21 उमेदवारी अर्ज दाखल केले, तर सेलू तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून यासाठी एकूण 1 हजार 306 अर्ज दाखल केले. जिंतूरात सर्वात जास्त म्हणजे 101 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून, तेथे 2 हजार 127 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाथरी तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 56, मानवत तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 9, सोनपेठ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी 904, गंगाखेड तालुक्यातील 70 ग्रामपंचायतीसाठी एक हजार 768, पालम तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीसाठी एक हजार 270, पूर्णा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 602 उमेदवारी अर्ज दाखल केले. असे एकूण 13 हजार 63 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

तालुकानिहाय वैध उमेदवार -

सर्व तालुक्यांच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या अर्जांची छाननी झाली. यात एकूण 145 अर्ज अवैध ठरले. यात परभणी तालुक्यात 16 अर्ज अवैध ठरले. सेलू तालुक्यात 12, जिंतूरात 14, पाथरीत 5, मानवतमध्ये 16, सोनपेठात दहा, गंगाखेडमध्ये 24, पालममध्ये 26 तर पूर्णा तालुक्यात 22 अर्ज अवैध ठरले. तर परभणी तालुक्यात 2 हजार 5 अर्ज वैध ठरले. सेलू तालुक्यात 1 हजार 294, जिंतूरात 2 हजार 113, पाथरी 1 हजार 51, मानवत 993, सोनपेठ 894, गंगाखेड 1 हजार 633, पालममध्ये एक हजार 244 तर पूर्णा तालुक्यात 1 हजार 580 अर्ज वैध ठरले. असे एकूण तर 12 हजार 807 उमेदवारी अर्ज वैध ठरले. छाननीअंती परभणी तालुक्यात 1 हजार 944, सेलू 1 हजार 277, जिंतूर 1 हजार 109, पाथरीत 1 हजार 51, मानवत 993, सोनपेठात 885, गंगाखेड 1 हजार 600, पालम 1 हजार 244 तर पूर्णा तालुक्यात 1 हजार 580 असे एकूण 12 हजार 733 छाननी अंती वैध ठरलेले उमेदवार आहेत.

हेही वाचा-राज्यातील मंत्री, अधिकाऱ्यांची उधारी वाढली; पैसे चुकते करण्याचे फर्मान

ABOUT THE AUTHOR

...view details