महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वंचित' कडून परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवार जाहीर; नवख्यांना संधी देऊन दिला धक्का

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये परभणी विधानसभेसाठी मोहम्मद गौस झैन हे तर पाथरीसाठी कॉम्रेड नेते विलास बाबर, जिंतूरमधून मनोहर वाकळे आणि गंगाखेड विधानसभेसाठी जिल्हा परिषद सदस्य करुणा कुंडगीर यांना उमेदवारी दिली आहे.

'वंचित' कडून परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवार जाहीर; नवख्यांना संधी देऊन दिला धक्का

By

Published : Oct 1, 2019, 3:21 AM IST

परभणी -लोकसभा निवडणुकीत वादळ निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवारांची आज घोषणा झाली. विशेष म्हणजे वंचित कडून लढण्यास परभणी जिल्ह्यातील काही दिग्गज उमेदवार प्रयत्नशील होते. मात्र, असे असतानाही वंचितने नवख्या उमेदवारांना संधी देऊन एक प्रकारे सर्वांनाच धक्का दिला आहे.

हे ही वाचा -कोल्हापूर सोडून भाजप-सेनेची राज्यात युती? चर्चांना उधाण

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये परभणी विधानसभेसाठी मोहम्मद गौस झैन हे तर पाथरीसाठी कॉम्रेड नेते विलास बाबर, जिंतूरमधून मनोहर वाकळे आणि गंगाखेड विधानसभेसाठी जिल्हा परिषद सदस्य करुणा कुंडगीर यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेतील वंचित फॅक्टर पाहता विधानसभेसाठी वंचितकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित कडून तगडे उमेदवार उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु प्रत्यक्षात नवख्या उमेदवारांना संधी देऊन वंचितने सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र, यामधील एकाही उमेदवाराला विधानसभा निवडणुकीचा अनुभव नाही.

हे ही वाचा -आघाडीच्या उमेदवाराचे नाव वंचितच्या यादीत; राजकीय क्षेत्रात खळबळ

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून पाथरीसाठी सुनील बावळे पाटील, गंगाखेडसाठी काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव तसेच परभणीतून लोकसभेचे उमेदवार आलमगीर खान, धर्मराज चव्हाण आदींसह अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या. तसेच वंचितच्या कोर कमिटीने त्यावेळी आमच्याकडे अजूनही काही पक्षातील दिग्गज नेते संपर्क करत आहेत असा दावा केला होता. परंतु कुठल्याही मोठ्या पक्षाचा उमेदवार प्रत्यक्षात त्यांच्याकडे गेला नाही. पडद्यामागून अनेकजण वंचितच्या संपर्कात होते हे नाकारता येणार नाही.

हे ही वाचा -महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू

असे असताना परभणी जिल्ह्यात वंचितच्या गळाला एकही मोठा उमेदवार लागलेला नाही. त्यामुळे त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन परभणी जिल्ह्यातील निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details