महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीच्या सीमा सर्वांसाठी बंद, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवले माघारी - मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवले माघारी

मुंबईचा वांद्रे हा भाग कोरोना प्रभावित आहे. या भागात राहाणाऱ्या मंत्रालयात वरिष्ठ पदावरील एका अधिकाऱ्याने रविवारी रात्री पाथरी-सेलूमार्गे संपूर्ण कुटुंबासह परभणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परभणीच्या सीमेवरच त्यांना अडवण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रोखठोक भूमिका घेऊन कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्या कुटुंबाची रात्रभर सोय करून त्यांना सकाळी मुंबईला परत पाठवून दिले आहे.

परभणीच्या सीमा सर्वांसाठी बंद
परभणीच्या सीमा सर्वांसाठी बंद

By

Published : Apr 14, 2020, 9:10 AM IST

Updated : Apr 14, 2020, 11:57 AM IST

परभणी- मुंबईतील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या संबंधातील मोठ्या उद्योजकाला लोणावळ्यात सुट्टी घालवण्यासाठी प्रवासाची परवानगी दिली होती. एकीकडे हे प्रकरण घडले असतानाच परभणीत मात्र प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ग्रीन झोन असलेल्या परभणी जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची रात्री राहण्याची सोय करून त्यांना सकाळ होताच परत मुंबईत पाठवण्यात आले आहे.

मुंबईचा वांद्रे हा भाग कोरोना प्रभावित आहे. या भागात राहाणाऱ्या मंत्रालयात वरिष्ठ पदावरील एका अधिकाऱ्याने रविवारी रात्री पाथरी-सेलूमार्गे संपूर्ण कुटुंबासह परभणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परभणीच्या सीमेवरच त्यांना अडवण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रोखठोक भूमिका घेऊन कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्या कुटुंबाची रात्रभर सोय करून त्यांना सकाळी मुंबईला परत पाठवून दिले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले, की 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातून कोणी बाहेर जाणार नाही. तसेच विनापरवानगी कोणी जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. विशेषतः कोरोना प्रभावित असलेल्या भागातून जर कोणी येत असेल तर त्याची कडक तपासणी करून त्याला आम्ही परत पाठवत आहोत. रविवारी रात्री मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी आपल्या संपूर्ण कुटुंबासह परभणी जिल्ह्यात प्रवेश करण्याकरता आले होते. मात्र ते मुंबईच्या वांद्रे या भागातील होते आणि वांद्रे हा भाग कोरोना प्रभावित आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे त्यांना परभणी जिल्ह्यात तुम्हाला प्रवेश करता येणार नाही, असे सांगितले.

परभणीच्या सीमा सर्वांसाठी बंद

रात्रीची वेळ असल्याने त्यांना आम्ही एका शाळेत थांबवून त्यांची व्यवस्था केली आणि सकाळी परत त्यांना मुंबईला पाठवून दिले. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम जिल्ह्यांच्या सीमा बंद करणारा परभणी जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी यापुढेही प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना नेहमीच कराव्या लागणार असून त्या केल्या जातील, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले.-

Last Updated : Apr 14, 2020, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details