महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ओबीसीं'चा राजकीय आरक्षणासाठी गंगाखेडमध्ये रास्तारोको - सर्वोच्च न्यायालय बातमी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी 'ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव एकजुटीतून हाणून पाडू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिला आहे.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Jun 17, 2021, 3:33 PM IST

Updated : Jun 17, 2021, 4:35 PM IST

परभणी- सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले 'ओबीसी' आरक्षण हा न्यायालयाआडून ओबीसींचे राजकीय अस्तीत्व संपवण्याचा डाव आहे, असा आरोप करत गुरुवारी (दि. 17 जून) परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी 'ओबीसीचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव एकजुटीतून हाणून पाडू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिला आहे.

'ओबीसीं'चा राजकीय आरक्षणासाठी गंगाखेडमध्ये रास्तारोको

आरक्षण रद्द झाल्याने इतर मागासवर्गीयांमध्ये नाराजी

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण नुकतेच रद्द केले आहे. यावरून इतर मागासवर्गीय समाजात तीव्र नाराजीची भावना आहे. हे आरक्षण परत देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 17 जून) राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अंतर्गत गंगाखेड येथील परळी नाका येथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

'ओबीसी जनगणना तत्काळ करावी'

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेली ओबीसी जनगणना तत्काळ करावी, अशी मागणी गोविंद यादव यांनी याप्रसंगी केली. तर मनसेच्या बालाजी मुंडे यांनी ओबीसींचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण आवश्यक असल्याचे सांगीतले. ते न मिळाल्यास भविष्यात ओबीसींच्या भावनांचा ऊद्रेक होईल, असा इशारा मुंडे यांनी दिला.

आंदोलनात यांचा सहभाग

या आंदोलनात ओबीसी संघर्ष समितीचे संयोजक तथा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, निमंत्रक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, रासपचे सुरेश बंडगर, धनगर साम्राज्य सेनेचे नारायणराव घनवटे, माजी उपसभापती माधवराव शेंडगे, नगरसेवक तुकाराम तांदळे, सुवर्णकार समाजाचे तालुकाध्यक्ष विजय डहाळे, तुकाराम मैड, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, नाभिक सेनेचे बालासाहेब पारवे, माजी सरपंच गोविंद लटपटे, मेजर प्रल्हाद मुंडे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नागेश डमरे, माळी महासंघांचे परसराम गिराम, सदाशीव कुंडगीर, राहुल फड, उद्धव शिंदे, मनोज मुरकुटे, रणजीत शिंदे, गजानन आंबेकर, शाम उदावंत, इंद्रजीत हाके, उत्तमराव व्हावळे, बाळासाहेब सोनटक्के आदिंसह बहुसंख्य ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा -परभणीत पावसाचा कहर; शेकडो घरात पाणी, लेंडी नदीला पूर

Last Updated : Jun 17, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details