परभणी- तब्बल अडीचशे कोटी रुपयांच्या परभणी-जिंतूर सिमेंट रस्ता कामाचे तीन-तेरा वाजले आहेत. चालू वर्षातील नवव्या महिन्यात हे काम पूर्ण होणार होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत हा संपूर्ण 40 किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आला असून यावरून जाताना वाहनधारकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त किंवा पूर्ण करावा, या मागणीसाठी जिंतूर येथील तब्बल 22 संघटनांनी एकत्र येऊन रास्तारोको, बंद आणि जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जिंतूर-परभणी रस्त्याचे काम रखडले; रास्तारोको, जेलभरोसह बंदचा इशारा - आंदोलन
यासंदर्भात जनआंदोलन समितीच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बुधवारी जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पावसाळ्यामध्ये वाहनधारकांची अडचण होऊ नये, यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्या, या संदर्भातले निवेदन देण्यात आले. 22 सामाजिक संघटनाच्यावतीने हे निवेदन देण्यात आले असून यानंतर 20 मे रोजी 10 हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात येणार आहे.
जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्यावतीने आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात जनआंदोलन समितीच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बुधवारी जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पावसाळ्यामध्ये वाहनधारकांची अडचण होऊ नये, यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्या, या संदर्भातले निवेदन देण्यात आले. 22 सामाजिक संघटनाच्यावतीने हे निवेदन देण्यात आले असून यानंतर 20 मे रोजी 10 हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात येणार आहे. यानंतरही हे काम सुरू झाले नाही तर 1 जून रोजी जिंतूर तालुका बंद, रास्ता रोको तसेच जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, यावेळी जनआंदोलन संघर्ष समितीचे अॅड. मनोज सारडा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, आडत असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देवकर, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आशिष सावजी, नेमगिरी संस्थांचे रत्नदीप कळमकर, प्रेस क्लबचे संस्थापक विजय चोरडिया, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अॅड. विनोद राठोड, मुख्याध्यापक गोविंद लहाने, अॅड. गोपाळ रोकडे, विनोद पाचपिले, प्रदीप कोकडवार, अॅड. दीपक साळेगावकर आदींची उपस्थिती होती.