महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2019, 4:26 PM IST

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज; ५६ मतदान केंद्र संवेदनशील

जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड, आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा तथा निवडणूक प्रशासनाच्या वतीने यासाठीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

परभणीत विधानसभा मतदानासाठी प्रशासन सज्ज; ५६ मतदान केंद्र संवेदनशील

परभणी - जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १३ लाख ९९ हजार ५६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, निवडणूक कर्मचारी आजच (रविवारी) मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. एकूण ११३७ पैकी ५६ मतदानकेंद्र संवेदनशील असून प्रत्येकी चार मतदान केंद्र हे सखी आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून स्थापित करण्यात आले आहेत.

परभणीत विधानसभा मतदानासाठी प्रशासन सज्ज; ५६ मतदान केंद्र संवेदनशील

जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड, आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा तथा निवडणूक प्रशासनाच्या वतीने यासाठीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. परभणी विधानसभा मतदार मतदारसंघासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्हीएम मशीन वाटप केंद्र तयार करण्यात आले आहे. तसेच याच ठिकाणी मतमोजणी देखील होणार आहे.

हेही वाचा -नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक

या ठिकाणावरून रविवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच संबंधित मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कर्मचारी हजर झाले होते. प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन रवाना झाले आहेत.

हेही वाचा -वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त

दरम्यान, जिंतूर मतदारसंघासाठी औंढा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तर गंगाखेड विधानसभेची मतमोजणी संत जनाबाई महाविद्यालयात आणि पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी पाथरीच्या आयटीआय महाविद्यालयात ईव्हीएम वाटप आणि मतमोजणी होणार आहे. जिंतूर मतदारसंघात एकूण ३ लाख ५० हजार ८३४ मतदार असून त्यापैकी १ लाख ८१ हजार ८३२ पुरुष तर १ लाख ६९ हजार महिला मतदार आहेत. त्याप्रमाणेच परभणीत १ लाख ५८ हजार ४८९ पुरुष तर १ लाख ४७ हजार ८०९ स्त्री मतदार असून एकूण ३ लाख ६ हजार २९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गंगाखेड विधानसभेत २ लाख २ हजार ३९७ पुरुष तर १ लाख ८७ हजार २६३ स्त्री असे एकूण ३ लाख ८८ हजार ६६२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५३ हजार ७६७ पैकी १ लाख ८४ हजार १६४ पुरुष मतदार असून १ लाख ६९ हजार ५९९ स्त्री मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १३ लाख ९९ हजार ५६२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

हेही वाचा -महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

दरम्यान, मतदानासाठी एकूण ११३७ मतदान केंद्र असून यामध्ये जिंतूर ८९, परभणी १६१, गंगाखेड ७५९ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात १२८ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक आदर्श आणि एक सखी मतदान केंद्र प्रस्थापित करण्यात आले आहे. एकूण चार सखी आणि चार आदर्श मतदारसंघ आहेत. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये एकूण ५६ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. ज्यावर पोलिसांचा जास्तीचा बंदोबस्त राहणार आहे. या मतदान केंद्रावर विशेष लक्ष असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details