महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार; आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाची 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

a man continuously raped of a minor girl by  threatening her video to go viral; 5 days in jail for the accused
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सतत अत्त्याचार; तरुणाला 5 दिवसांची पोलिस कोठडी

By

Published : Mar 13, 2020, 1:08 AM IST

Updated : Mar 13, 2020, 2:09 AM IST

परभणी - अल्पवयीन मुलीला तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत समोर आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर तरुणाला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आल असता त्याची 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा - दिवस बलात्कार.. मध्य प्रदेशात केले कृत्य

अब्दुल बारी मुजाहेद खान हा तरूण अल्पवयीन मुलीच्या भावाला मारण्याची आणि वडिलांची नोकरी घालवण्याची धमकी देत मुलीशी लगट करायचा. तो नेहमी तिचा पाठलाग करून तिच्यावर दबाव टाकत होता मात्र, मुलीने विरोध केला असता, तिला भावाला उचलतो आणि वडिलांची नोकरी घालवतो, अशी धमकी देत होता. या धमकीला घाबरुन केवळ भीतीपोटी तिने त्याच्यासोबत बोलणे सुरू केले. मात्र, त्याचाच फायदा घेऊन त्याने मे आणि जून महिन्यात अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला. मे ते डिसेंबर 2019 दरम्यान त्याने मुलीवर तिच्या घरात, स्वतःच्या घरात, गाडीमध्ये अत्याचार केला. गाडीमध्ये केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा तिला ब्लॅकमेल करून अत्याचार केले. सदर तरूणी ही बारावीची परीक्षा देत आहे. यादरम्यान, तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने घरच्यांना दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी बुधवारी कोतवाली पोलिसांत तरूणाविरोधात तक्रार दिल्यानंतर अब्दुल बारी मुजाहिद खानला अटक करण्यात आली. याप्रकरणी कलम ३७६ आणि ५०६ (पोस्को, बाल लैंगिक अत्याचार) या कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याची ५ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात त्याला सहकार्य करणाऱ्या अमेर हाजमा राज याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Mar 13, 2020, 2:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details