महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून

सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याला रोपवाटिका चालकाने फसवले. त्यामुळे त्याच्यावर शेतात उगवलेले उत्पादन उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीसोबत मनस्तापही सहन करावा लागत आहे.

शेतातून मिर्चीचे रोपटे उपटून फेकून टाकताना शेतकरी

By

Published : Sep 23, 2019, 1:02 PM IST

परभणी- अनियमित आणि अल्प पावसामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाही. निसर्गासोबतच सुलतानी संकटामुळे शेतकरी हताश झाला आहे. सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याला रोपवाटिका चालकाने फसवले आहे. त्यामुळे त्याच्यावर शेतात उगवलेले पीक उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीसोबत मनस्तापही सहन करावा लागत आहे.

शेतातून मिर्चीचे रोपटे उपटून फेकून टाकताना शेतकरी

ज्ञानेश्वर मोगल असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सेलू तालुक्यातील नरवाडी येथील रहिवासी आहेत. मोगल यांनी गावाजवळ असलेल्या लिपने अॅग्रो रोपवाटिका येथून कलश कंपनीचे मगधीरा हे मिरचीचे वाण घेतले होते. ते वाण त्यांनी आपल्या शेतातील १० गुंठा जमिनीवर लावले होते. यासाठी त्यांनी १५ हजाराची रोपे आणली होती. रोप घेताना रोपवाटिका चालक लिपने यांनी मिरची बहारात आल्यावर पोपटी रंगाची होईल, असे सागितले होते. पण प्रत्यक्षात मिरची बहारात आल्यावर काळी पडू लागली. त्यामुळे या मिर्चीला बाजारात विकत घ्यायला कोणीही तैयार नव्हते. परिणामी ज्ञानेश्वर यांनी ही काळी पडलेली मिरची उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आणि सर्व मिरचीची झाडे उपटून टाकली.

हेही वाचा-परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी

मिरची लागवडीसाठी मोगल यांना एकूण २० हजार रुपये खर्च आला होता. या मिरचीपासून त्यांना ७५ हजार रुपयांची कमाई झाली असती. मात्र नुकसान झाल्याने त्यांना एकूण १ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत प्रशासनाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details