महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेला शेतकरी; बंधाऱ्याला अडकल्याने वाचले प्राण - पाथरी-आष्टी नदी पूर बातमी

मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील नदीला पूर आला होता. या पुरामुळे खेडूला गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले. या पाण्यातून वाट काढताना एक शेतकरी अचानक वाहून गेला. मात्र, पुढे जाऊन बंधाऱ्याला अडकल्याने त्याचे प्राण वाचले दरम्यान, हा शेतकरी पाण्यात वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पूर

By

Published : Sep 25, 2019, 8:43 AM IST

परभणी - रात्रभर पडलेल्या पावसामुळे सकाळी पाथरी तालुक्यातील नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यातून वाट काढत असताना एक शेतकरी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. मात्र, पुढे एका बंधाऱ्याला अडकून पडल्याने या शेतकऱयाचे प्राण वाचले. ज्ञानोबा बाबुराव उंडे (45) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, हा शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल


सदर घटना पाथरी तालुक्यातील खेरडा परिसरातील आहे. 23 सप्टेंबरच्या पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील नदीला पूर आला होता. या पुरामुळे खेडूला गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३ ते ४ फूट पाणी आले होते. या रस्त्यावर खेरडा गावापासून अगदी 400 मीटर अंतरावर मोठा नाला आहे.

हेही वाचा - परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून


23 सप्टेंबर रोजी पाथरी आणि मानवत तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे पाणी खेरडा-खेडुळा नाल्याला आले, सकाळी पाण्याचा जोर वाढल्याने पुलावरून 4 फूटपर्यंत पाणी वाहत होते. खेरडा येथील काही शेतकरी पहाटे शेतातील गाय-म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले होते. मात्र, परत येत असताना या नाल्याच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सगळे जण पुरात अडकून पडले. याची माहिती कळताच गावातील अनेक नागरिकांनी तिकडे धाव घेतली आणि दोरीच्या साह्याने पुरात अडकलेल्यांना गावाकडे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, ज्ञानोबा उंडे हे दोरीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून येत असताना खड्ड्यात अडकले. ज्यामुळे दोरीचा हात निसटून ते पत्रात वाहून गेले. मात्र, पुढे ३०० मीटर अंतरापर्यंत वाहून गेल्यावर नाल्यावर असणाऱ्या एका बंधाऱ्याला ते अडकल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

हेही वाचा - परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी


दरम्यान, पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून जातानाचा हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस पडत नसल्याने पुराचे प्रसंग फार क्वचितच येऊ लागले आहेत. आणि त्यातही अशी घटना घडल्याने सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा - जिंतूरमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री हॉटेलसह दोन घरे फोडली

ABOUT THE AUTHOR

...view details