महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत 10 दिवसात 9348 कोरोनामुक्त; नवीन 374 बाधित, 8 जणांचा मृत्यू - parbhani corona cure patients news

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परभणीतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात होता. त्यात एप्रिल महिन्यात तर प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षभरात आढळलेले रुग्ण फक्त एप्रिल महिन्यात आढळून आले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 43 हजार 344 वर पोहोचला आहे.

corona hospital parbhani
कोरोना रुग्णालय परभणी

By

Published : May 10, 2021, 8:21 PM IST

परभणी -राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत परभणीत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज सोमवारी तब्बल 1 हजार 265 जणांनी कोरोनावर मात केली. तर 374 नविन बाधितांनची नोंद करण्यात आली. तसेच मृतांचीही संख्या कमी झाली आहे. मागील 24 तासात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 10 दिवसात 9348 रुग्ण कोरोनामुक्त -

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परभणीतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात होता. त्यात एप्रिल महिन्यात तर प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षभरात आढळलेले रुग्ण फक्त एप्रिल महिन्यात आढळून आले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 43 हजार 344 वर पोहोचला आहे. मात्र, आता मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. 1 मेपासून आज 10 मेदरम्यान 2 आणि 6 तारीख वगळता दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या 10 दिवसात नव्याने 6981 नवे बाधित आढळले. तर 9348 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. हे समाधानकारक चित्र दिसत आहे.

हजारावर कोरोनाबधितांचा मृत्यू -

सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 5 हजार 671 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 35 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 43 हजार 344 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 36 हजार 638 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 64 हजार 932 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 21 हजार 480 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, 43 हजार 344 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. तर 1059 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.

आयटीआय सेंटरमध्ये 5 बधितांचा मृत्यू -

दरम्यान, आज झालेल्या मृतामध्ये यात 4 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटर मध्ये 1 तर चिरावू आणि स्वाती या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 अशा एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात 696 बेड शिल्लक -

दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 31 कोरोना हॉस्पिटल सुरू असून, या रुग्णालयांमध्ये 1910 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या 696 बेड रिकामे आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 2 तर जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये 71 बेड, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 69, परभणी आयसीयू 2, स्वाती 10, भारत हॉस्पिटल 41, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 37, देशमुख 8, अक्षदा मंगल कार्यालय 77, सूर्या 10, प्राईम 14, मोरे 4, अनन्या 3, सामले 8, सिद्धिविनायक 5, ह्यात 9, सुरवसे मॅटर्निटी 4, पाडेला 3, पार्वती 10, रेणुका 205, देहरक्षा 17, स्पर्श हॉस्पिटल 14, गोकुळ 9, पोले 34, पांडुरंग 20 तर कान्हेकर या खाजगी हॉस्पिरटलमध्ये 10 बेड शिल्लक आहेत. तर 4 हजार 457 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details