महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात 928 नवे कोरोनाबाधित; 17 रुग्णांचा मृत्यू - परभणी कोरोना मृत्यू 30 एप्रिल 2021

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून शुक्रवारी 928 नवीन बाधित आढळले. तर 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 8 हजार 184 बाधित उपचार घेत आहेत.

Parbhani corona update
परभणी कोरोना अपडेट

By

Published : May 1, 2021, 8:42 AM IST

परभणी -देशात कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. परभणी जिल्ह्यातही दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 928 नवे रुग्ण आढळले, तर 573 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात 17 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामध्ये 10 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे.

8184 बधितांवर उपचार सुरू -

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून शुक्रवारी 928 नवीन बाधित आढळले. तर 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 8 हजार 184 बाधित उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 889 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 36 हजार 363 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 27 हजार 290 व्यक्ती कोरोनामुक्त झाले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 42 हजार 259 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 5 हजार 885 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 36 हजार 363 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 962 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.

या रुग्णालयात झाले कोरोनाबधितांचे मृत्यू -

दरम्यान, गेल्या 24 तासात 17 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 10 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे. यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल (4), आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटल (7) आणि जिल्हा परिषदेच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये (2), असे 13 रुग्ण मृत्यूमुखी पडले. याशिवाय चिरावू, भारत, स्वाती व देशमुख या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1, असे एकूण 41 रुग्ण दगावले आहेत.

परभणी जिल्ह्यात 331 बेड शिल्लक -

दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत. ज्यामध्ये 8 हजार 184 रुग्ण उपचार घेत आहेत. यासाठी 30 रुग्णालयांमध्ये 1837 बेडची व्यवस्था करण्यात आली आहेत. त्यापैकी सध्या केवळ 331 बेड रिकामे आहेत.

यात सर्वाधिक बेड रेणुका हॉस्पिटल येथे 105 बेड रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये 48 बेड तर जिल्हा रुग्णालयात 1, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 49, भारत हॉस्पिटल 27, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 28 देशमुख 2, अक्षदा मंगल कार्यालय 13, मोरे 3, सामाले हॉस्पिटल 2, सिद्धिविनायक 3, ह्यात 2, सुरवसे मॅटर्निटी 3, देहरक्षा हॉस्पिटल 16, स्पर्श हॉस्पिटल 14, तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 12 तर पार्वती हॉस्पिटलमध्ये 3 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय 6 हजार 678 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details