महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत बेशिस्त वाहनचालकांकडून 90 लाखांचा दंड वसूल; वाहतूक विभागाची कारवाई - बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल परभणी

2019 या वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२३ वाहनांविरुध्द खटले दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करत जवळपास दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

traffic
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Dec 30, 2019, 7:48 PM IST

परभणी - शहर वाहतूक विभागातर्फे सरत्या वर्षात तब्बल ९० लाख १८ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 36 हजार 950 वाहनधारकांकडून वर्षभरात हा दंड वसूल करण्यात आला. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

परभणीत बेशिस्त वाहनचालकांकडून 90 लाखांचा दंड वसूल

2019 या वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२३ वाहनांविरुध्द खटले दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करत जवळपास दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -बुलडाण्यात बेशिस्त वाहन चालकांकडून 5 लाख 97 हजारांचा दंड वसूल

अरुंद रस्ते तसेच वाहन चालकांमधील गैरशिस्त यामुळे शहरातील वाहतुक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. शहर वाहतूक शाखेने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन बैठकादेखील घेतल्या होत्या. याशिवाय, शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते. ३१ डिसेंबरलाही शहरात वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details