महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लसीचे 9 हजार 330 डोस परभणीत दाखल

जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येणारी कोरोना लस आज उपलब्ध झाली आहे. 9 हजार 330 एवढे डोस भंडारामध्ये संध्याकाळी सातच्या दरम्यान दाखल झाले.

Corona vaccine Parbhani
कोरोना लस परभणी आगमन

By

Published : Jan 13, 2021, 8:32 PM IST

Updated : Jan 14, 2021, 5:52 PM IST

परभणी -जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येणारी कोरोना लस आज उपलब्ध झाली. 9 हजार 330 एवढे डोस भंडारामध्ये संध्याकाळी सातच्या दरम्यान दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या लसीच्या व्हॅनचे स्वागत करून वितरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

कोरोना लसीचे 9 हजार 330 डोस परभणीत दाखल

हेही वाचा -महामंडळाच्या बसेसवर 'संभाजीनगर'च्या पाट्या

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या 'कोविशील्ड' या लसीची उपलब्धता परभणीसाठी झाली आहे. पुणे येथून विमानाने औरंगाबाद येथे आलेली ही लस मुख्य औषधी निर्माण अधिकारी मंगला खिस्ते या स्वतः औरंगाबाद येथे जाऊन परभणीत घेऊन आल्या आहेत. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जायकवाडी परिसरातील लस भांडार येथे ही लस दाखल झाली.

'या' तीन ठिकाणी होणार वितरण -

लस आल्यानंतर सर्वप्रथम जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्हॅनचे स्वागत करून चालकाचा सत्कार केला. त्यानंतर ही लस उतरून घेण्यात आली. तसेच, या लसीच्या साठवणूक आणि वितरणसंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांना माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात 9 हजार 330 एवढ्या लसीचे वितरण केले जाणार आहे. यासाठी 16 जानेवारीपासून दररोज शंभर डोस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. या डोसचे वितरण परभणी शहरातील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात, तसेच जिल्हा रुग्णालयात आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी होणार असल्याचे ते म्हणाले.

40 हजार डोस साठवण्याची क्षमता -

दरम्यान, परभणी येथील लस भांडारमध्ये 40 हजार लसींचे डोस एकावेळी साठवण्याची क्षमता आहे. त्यानुसार परभणीतून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यासाठी 9 हजार 500 एवढ्या लसीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 330 डोस उपलब्ध झाले आहेत. ते या ठिकाणी सुरक्षित साठवण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, औषधी निर्माण अधिकारी मंगला खिस्ते आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा -'बर्ड फ्ल्यू' श्वसनसंस्थेचा रोग; स्थलांतरित पक्षांच्या विष्टेतून होतो संसर्ग - डॉ. देशपांडे

Last Updated : Jan 14, 2021, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details