परभणी - जिल्ह्यातील गंगाखेड-परळी रस्त्यावरील सोनपेठ हद्दीत ऑटो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात ऑटोतील चार व्यक्ती जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज (रविवारी) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत चौघेही अंबाजोगाई येथील रहिवाशी आहेत.
सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करम पाटीजवळ आज (रविवारी) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ऑटो चार जणांना घेऊन गंगाखेड-परळी रस्त्याने परळीकडे जात होता. ते सर्वजण गंगाखेड तालुक्यात लग्नासाठी आले होते. तेथून ते सर्व जण गावाकडे ऑटोने परत जात होते. करम पाटीजवळ समोरून भरधाव आलेल्या हायवा ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात ऑटोतील 4 जण जागीच ठार झाले. अपघात घडताच तेथील नागरिकांनी ऑटोतील सर्वाना तातडीने गंगाखेडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.