परभणी - जिल्हा कारागृहात 84 बंदिवान पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी 16 बंदिवानांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, यातील खून आणि गांजा तस्करी प्रकरणातील 3 बंदिवान मंगळवारी पहाटेच्या सुमारास खिडकीचे गज तोडून फरार झाले. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक; परभणीच्या जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित बंदिवान फरार - बंदिवान अपडेट न्यूज
जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये अस्थिव्यंग रुग्णालयाच्या इमारतीत बनवण्यात आलेल्या कोरोना वॉर्डात या बंदिवानावर उपचार सुरू होते. त्यांच्यासाठी तिसऱ्या मजल्यावर एक विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली होती. परंतु, त्यापैकी 2 बंदिवानावर खुनाचा तर एकावर गांजा बाळगल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, ते तीनही कैदी खिडकीचे गज कापून, चादर आणि बेडशीटच्या सहाय्याने कैदी इमारतीच्या खाली उतरून फरार झाले.
परभणी महापालिकेने 21 ऑगस्टला जिल्हा कारागृहातील 351 बंदिवानांची रॅपीड अॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी केली. त्यामध्ये 61 जण पॉझिटिव्ह आढळले. 22 ऑगस्टला 96 बंदिवानांच्या तपासण्या पार पडल्या, ज्यातील 23 कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. त्यानुसार एकूण 84 बंदिवान कोरोना बाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी 16 बंदिवानासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये अस्थिव्यंग रुग्णालयाच्या इमारतीत बनवण्यात आलेल्या कोरोना वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासाठी तिसऱ्या मजल्यावर एक विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली होती. परंतु, त्यापैकी 2 बंदिवानावर खुनाचा तर एकावर गांजा बाळगल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, ते तीनही बंदिवान खिडकीचे गज कापून, चादर आणि बेडशीटच्या सहाय्याने इमारतीच्या खाली उतरून फरार झाले. फरार झालेल्या या तीनही रुग्णांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षेवर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. आरोपींची सुरक्षाव्यवस्था नेमके काय करत होती ? हा प्रश्न आहे. तसेच हे बंदिवान कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे प्रशासनासमोर सुद्धा हे प्रश्न निर्माण झाला आहे. या बंदिवानाच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पोलीस पथके स्थापन केली असून, ते पसार झालेल्या तिन्ही पॉझिटिव्ह बंदिवानाचा कसून शोध घेत आहेत.