परभणी -पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून अनेक वारकरी जातात. त्यामुळे या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने तब्बल २०५ जादा बसेस सोडल्या आहेत. या बसेस २१ जुलै अर्थात परतवारीपर्यंत धावणार आहेत.
परभणीतून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी २०५ जादा बसेसची सोय
परभणी जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला जात असल्याने त्यांच्या सोयीसाठी ९ जुलै ते २१ जुलै म्हणजे परतवारी पर्यंत २०५ जादा बसेस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
परभणी एसटी महामंडळातर्गंत परभणी सह हिंगोली जिल्ह्यातील ७ आगारांचा समावेश होतो. या ७ ही आगारातून या बसेस धावणार आहेत. सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू असली तरी चांगला पाऊस पडू दे, भरघोस पीक पाणी येऊ दे, म्हणून प्रार्थना करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.
जिल्ह्यातील वारकरीही मोठ्या संख्येने पंढरपूरला जात असल्याने त्यांच्या सोयीसाठी या बसेस धावणार आहेत. ९ जुलैपासून सुरू झालेल्या या बसेस २१ जुलै अर्थात परतवारी पर्यंत धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. यामुळे वारकऱ्यांना चांगली सोय उपलब्ध झाली आहे.