ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीच्या 'बोरवंड'ची 20 घरे 8 महिन्यांपासून अंधारात; वीज मंडळाची टाळाटाळ - बोरवंड वीज बातमी

शहरापासून जवळच असलेल्या बोरवंड या गावातील 20 घरांना तब्बल 8 महिन्यांपासून वीज मिळालेली नाही. याबाबत या कुटुंबीयांनी शुक्रवारी परभणीतील वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

परभणीच्या 'बोरवंड'ची 20 घरे 8 महिन्यांपासून अंधारात
author img

By

Published : Sep 13, 2019, 5:54 PM IST

परभणी - शहरापासून जवळच असलेल्या बोरवंड या गावातील 20 घरे तब्बल 8 महिन्यांपासून अंधारात चाचपडत आहेत. तर, वीज महावितरणकडून या घरांना वीज पुरवठा करण्यास टाळाटाळ होत असल्याने या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

परभणीच्या 'बोरवंड'ची 20 घरे 8 महिन्यांपासून अंधारात


दरम्यान, या संदर्भात बोरवंड येथील जय मल्हार नगरातील (नवीन गाववस्ती) विजेपासून वंचित असणाऱ्या या कुटुंबीयांनी शुक्रवारी परभणीतील वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. जानेवारी महिन्यात त्यांच्या भागात विजेची लाईन ओढण्याकरता नवीन विद्युत खांब टाकण्यात आले. परंतु, त्यास 8 महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अजूनही या घरांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा - महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार - महादेव जानकर


दैठणा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात वारंवार ये-जा करुनसुद्धा त्यांना वीज देण्याबाबत वीज मंडळाकडून टाळाटाळ केल्या जात आहे. त्यामुळे हे कुटुंबीय अंधारात चाचपडत असून त्यांच्या मुला-बाळांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी मुलांचा अभ्यासही रखडला आहे. त्यामुळे संतापलेल्या या 20 कुटुंबीयांनी शुक्रवारी परभणीच्या महावितरण कार्यालयात धाव घेतली. याठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संभानाथ काळे यांच्यासह बोरवंड येथील रहिवासी अरुण यादव, रामभाऊ वैद्य, गंगाराम वैद्य, बळीराम लोखंडे, सुरेश लेवडे, नामदेव खवले, शेख शब्बीर, ज्ञानेश्वर इंगळे, दत्तराव लोखंडे, महालिंग लासे, माणिक बोबडे, उत्तम यादव, साहेबराव खवले आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा - परभणीच्या शाहु नगरात 95 हजारांच्या गांजासह तीन आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details