महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी : 'निम्नदुधना'ची 14 दारे उघडली; पूरस्थितीने वाहतूक ठप्प - nimna dudhna dam news

सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्नदुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस होत असल्याने सोमवारी दुपारपासूनच धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळपासून आज मंगळवारी पहाटेपर्यंत बारा दरवाजे उघडण्यात आले होते. तर आज सकाळी 8 वाजता हा विसर्ग आणखी वाढविण्यात आला. त्यानुसार सध्या एकूण 14 दारे 0.60 मीटरने उघडून त्यातून 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

14 doors of nimna dhudhna dam parbhani over heavy rain
'निम्नदुधना'ची 14 दारे उघडली

By

Published : Sep 22, 2021, 1:59 PM IST

Updated : Sep 22, 2021, 2:47 PM IST

परभणी - जिल्ह्यातील निम्नदुधना प्रकल्पाचे 14 दारे उघडून त्यामधून 30 हजारहुन अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग दुधना नदीच्या पात्रात केल्या जात आहे. परिणामी सेलूसह जिंतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे 55हून अधिक गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे. शिवाय जिंतूर आणि औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील प्रभावीत झाली आहे. दरम्यान, या परिस्थितीत शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निम्नदुधना धरणाची दृश्ये

14 दारं उघडून 30 हजार 324 क्युसेक्सने विसर्ग -

सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस होत असल्याने सोमवारी दुपारपासूनच धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळपासून आज मंगळवारी पहाटेपर्यंत बारा दरवाजे उघडण्यात आले होते. तर आज सकाळी 8 वाजता हा विसर्ग आणखी वाढविण्यात आला. त्यानुसार सध्या एकूण 14 दारे 0.60 मीटरने उघडून त्यातून 30 हजार 324 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

55 हून अधिक गावांचे दळणवळण ठप्प -

सेलू-देवगावफाटा मार्गे औरंगाबाद आणि जिंतूरकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच अतिवृष्टी व मोठ्या विसर्गाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी तालुकांतर्गत मुख्य रस्ते व जोडरस्त्यावरील नदी, नाल्यांना, ओढ्यांना पूर आला आहे. त्यातच कमी उंचीच्या पुलांवर पाणी वाहत असल्याने सुमारे 55 हून अधिक गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे. नदीकाठच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

हेही वाचा -'त्या' वक्तव्यावरुन रुपाली चाकणकरांची प्रविण दरेकरांविरोधात तक्रार दाखल

24 तासात 48 मिमी पाऊस -

दरम्यान, आज मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात गेल्या 24 तासांत 48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळे 5 हजार 464 क्युसेक्स दराने धरणात पाणी आले असून, सकाळी साडे सहा वाजेपर्यंत 13.367 दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

पावसाची जोरदार बॅटिंग -

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठपासून दहा वाजेपर्यंत लाभक्षेत्रातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने द्वार क्रमांक एक ते सात व आठ व ते चौदा हे दरवाजे 0.60 मीटरने उघडण्यात आली आहेत. त्याद्वारे 30 हजार 324 क्युसेक्स (प्रति सेकंद ८ लाख ५८ हजार ४३२ लिटर ) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Sep 22, 2021, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details