महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीवर धुक्याची चादर, 14 अंश सेल्सियस तापमानाची नोंद - परभणी जिल्हा बातमी

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज परभणीचे किमान तापमान 14 अंश सेल्सियस इतके निचांकी नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 30 अंश आहे. परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात व महामार्गावर थंडीमुळे सकाळी 7 वाजता धुक्याची चादर पसरलेली दिसून येत होती.

परभणीवर धुक्याची चादर

By

Published : Nov 21, 2019, 10:32 AM IST

परभणी- परतीचा पाऊस लांबल्याने परभणी जिल्ह्यातील थंडीने थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून परभणीतील थंडी कासावगतीने वाढत आहे. आज (गुरुवारी) सकाळी तर संपूर्ण परभणी शहर धुक्याखाली झाकोळले होते. त्यामुळे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली असून लोकांनी अडगळीला ठेवलेले स्वेटर, मफलर, पायमोजे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

परभणीवर धुक्याची चादर

हेही वाचा -परभणीत प्लास्टिक बंदीनंतरही पाणी पाऊचचा धंदा जोरात; दोनशे पोती प्लास्टिक जप्त

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज परभणीचे किमान तापमान 14 अंश सेल्सियस इतके निचांकी नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 30 अंश आहे.
परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात व महामार्गावर थंडीमुळे सकाळी 7 वाजता धुक्याची चादर पसरलेली दिसून येत होती. तसेच या थंडीचा फटका पहाटे दूध, पेपर, भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. ते उशिराने आपल्या कामांना सुरूवात करत आहेत.

हेही वाचा -परभणी जिल्हा परिषदेत होणार 'महाशिवआघाडी'चा प्रयोग?

महत्त्वाचे म्हणजे या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्दी, खोकला, तापीचे रूग्ण वाढत आहेत. सर्व रूग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये अधिक वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र डासांची निर्मिती झाली होती. त्यामुळे डेंगू सदृश्य आजार आणि तापीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी व आरोग्य जनजागृती केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details