परभणी -परभणीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. गुरुवारी 1 हजार 220 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर 19 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान, सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील विविध कोरोना रूग्णालयांमध्ये 6 हजार 508 बधितांवर उपचार सुरू आहेत.
परभणीत 1220 कोरोनाबाधितांची नोंद, 19 जणांचा मृत्यू
परभणीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. गुरुवारी 1 हजार 220 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर 19 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान, सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील विविध कोरोना रूग्णालयांमध्ये 6 हजार 508 बधितांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत 729 बधितांची मृत्यू -
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. परभणीत आजपर्यंत 729 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 29 हजार 30 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 21 हजार 793 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 23 हजार 67 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 93 हजार 193 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 28 हजार 882 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 852 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू -
दरम्यान गेल्या 24 तासात 19 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी जिल्हा रुग्णालयात 7 तर जिल्हा रुग्णालयाच्याच आयटीआय इमारतीमधील कोरोना रुग्णालयामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये झाला आहेत.
परभणी जिल्ह्यात 393 बेड रिकामे -
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 रुग्णालये सुरू आहेत. ज्यामध्ये 6 हजार 508 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, या सर्व 30 रुग्णालयांमध्ये 6 हजार 901 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी 393 बेड अजूनही रिकामे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेड रेणुका हॉस्पिटल येथे रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 52 बेड शिल्लक आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 1, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 20, भारत हॉस्पिटल 1, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 20, अक्षदा मंगल कार्यालय 21, सूर्या हॉस्पिटल 2, सिद्धिविनायक हॉस्पिटल 7, ह्यात हॉस्पिटल 3, सुरवसे मॅटर्निटी 5, क्षीरसागर हॉस्पिटल 2, पार्वती हॉस्पिटल 4, मानवतकर हॉस्पिटल 20, देहरक्षा हॉस्पिटल 22, स्पर्श हॉस्पिटल 20 तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 11 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
1023 संशयितांची तपासणी -
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 23 संशयितांची 'आरटीपीसीआर' चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये मनपाच्या वतीने विविध केंद्रांवर 223 संशयितांची तपासणी करण्यात आली, तर जिल्हा रुग्णालयात 194, अस्थिव्यंग रुग्णालयात 13, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात 108, गंगाखेड ग्रामीण केंद्रात 84, पालम ग्रामीण रुग्णालयात 9, तर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 39 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या. याप्रमाणे पूर्ण ग्रामीण आरोग्य केंद्रात 42, सोनपेठ ग्रामीण आरोग्य केंद्रात 136, पाथरी ग्रामीण आरोग्य केंद्रात 68, सेलू उपजिल्हा रुग्णालयात 82 तर मानवत ग्रामीण रुग्णालयात 24 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या.